शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

प्रारूप प्रभाग रचना अंतिम टप्प्यात

By admin | Updated: September 7, 2016 00:48 IST

आज होणार सादर : त्रिस्तरीय समिती करणार तपासणी

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, आयोगाच्या निर्देशानुसार प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव बुधवारी (दि.७) विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील त्रिस्तरीय समितीला सादर होणार आहे. सदर समिती प्रस्तावाची तपासणी करून तो मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे रवाना करणार आहे. प्रभाग रचनेकडे सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू आहे. त्यासाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीही स्थापन करण्यात आली आहे. रात्रंदिवस सदर रचना तयार करण्याचे काम नगररचना विभागाकडून केले जात आहे. त्यात प्रामुख्याने, प्रगणक गटांच्या सीमा हिरव्या रंगाने, जनगणना प्रभागांच्या सीमा निळ्या रंगाने, तर नवीन निवडणूक प्रभागांच्या हद्दी लाल रंगाने दर्शविण्यात येत आहेत. प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा तयार करण्यात येत असून, त्यांच्या हद्दीबाबतही स्पष्टता करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये समाविष्ट झालेले प्रगणक गट व नकाशानुसार त्या प्रभागामध्ये समाविष्ट होणारे प्रगणक गट एकच आहेत याबाबतचीही खात्री करून घेतली जात आहे. २०११च्या जनगणनेनुसार तयार करण्यात येणाऱ्या या प्रभाग रचनेत एकूण ३१ प्रभाग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात २९ प्रभागातील सदस्यसंख्या चार, तर दोन प्रभागांची सदस्य संख्या प्रत्येकी तीन असण्याची शक्यता आहे. नगररचना विभागाच्या अभियंत्यांमार्फत गुगलवरून तसेच उपलब्ध नकाशांवरून प्रारूप प्रभाग रचनेचे काम दिवस-रात्र सुरू आहे. महापालिका आयुक्तांकडून त्याबाबत दैनंदिन आढावा घेतला जात आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.७) प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्या त्रिस्तरीय समितीकडे सादर केला जाणार असून, समिती राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रस्ताव योग्य झाला आहे किंवा नाही, याची तपासणी करणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने विहित केलेल्या प्रमाणपत्रासह समिती आयोगाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव रवाना करणार आहे. प्रभाग रचना नेमकी कशी होते, याकडे आता सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागून असून, कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडते याचीही उत्सुकता ताणली गेली आहे. (प्रतिनिधी)