शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावी भाव घसरल्याने कांदा लिलाव बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 13:10 IST

लासलगाव : कांदा निर्यातबंदीनंतर केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे सोमवारी येथील बाजार समितीत कांद्याला कमी बाजारभाव जाहीर करण्यात आले.

लासलगाव : कांदा निर्यातबंदीनंतर केंद्र शासनाने साठवणुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयामुळे सोमवारी येथील बाजार समितीत कांद्याला कमी बाजारभाव जाहीर करण्यात आले. भाव कमी झाल्यानंतर कांदा उत्पादक संतप्त झाले व विचारणा करताच व्यापारी लिलावातून निघून गेले.त्यामुळे लासलगावचे लिलाव सकाळी पाच ते सहा वाहनातील लिलाव पुकारण्यात आल्यानंतर बंद पडले. सोमवारी सकाळी व्यापारी वर्गाची बैठक झाली. त्यात सुरू झालेल्या लिलावात ३००० ते ३३०० रूपये इतका कमी भाव जाहीर झाला.  शुक्र वारी बाजार समितीत ६८७ वाहनातील लिलाव किमान ११०० ते कमाल ३८८० व सरासरी ३६०० रूपये भावाने झाले होते. कमाल भावात सहाशे रूपयांची घसरण झाली तर सरासरी भावही सहाशे रूपयांनी कमी झाला . त्यामुळे संतप्त शेतकरी वर्गाने बाजार समिती प्रवेशद्वाराजवळ धाव घेत लासलगाव - पिंपळगाव बसंवत रस्त्यावर ठिय्या मांडला त्यामुळे वाहतुक ठप्प झाली. त्यानंतर लासलगाव येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी कांदा उत्पादकांची समजुत काढली. व त्यानंतर कांदा उत्पादक परत बाजार समतिीचे आवारात आले.काल सकाळी कांदा निर्यातबंदी लागु झाली व साठवणुकीची निर्बंधांचे निर्णयामुळे आता कांदा खरेदी करून खळ्यावर साठविण्याचे बाबत विचार विनीमय करण्याकरिता लासलगाव येथील कांदा खरेदीदार व्यापारी यांच्यात बैठक झाली. परंतु जिल्हा परिषद सदस्य डी .के .जगताप , लासलगाव मर्चंटस असोशिएनचे अध्यक्ष नंदकुमार डागा यांनी व्यापारी वर्गाशी चर्चा केली. त्यानंतर व्यापारी लिलावात आले. सकाळी तासभर लिलाव बंद होते. कांदा लिलावाचे कामकाज सुरू झाले.परंतू पाच ते सहा वाहनातील लिलावाचा पुकारा केवळ ३००० ते ३३०० रूपये भावाने झाला. त्यामुळे कमी भावाने उत्पादक हैराण झाले.त्यानंतर लिलावाचे कामकाज बंद पडले.ही घटना समजताच बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे , सुदिन टर्ले व पंकज होळकर, प्रकाश कुमावत यांनी नविन कांदा आवारात धाव घेतली परंतु लिलावाचे कामकाज बंद पडले. कांदा व्यापारी वर्गाचे कडील किरकोळ व्यापारी यांनी शंभर तर ठोक व्यापारी यांच्या करीता ५०० क्विंटल कांद्याची साठवणुकीची मर्यादा असल्याने आता साठवणुकीवर निर्बंधांचे चर्चेने व्यापारी वर्ग संभ्रमित झाला आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक