शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
3
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
4
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
5
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
6
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
7
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
8
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
9
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
11
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
12
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
13
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
14
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
15
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
16
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
17
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
18
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
19
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
20
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर आता मोठे खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:03 IST

शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

नाशिक : शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात साथ असताना कर्मचारी काय करतात, हे बघण्यासाठी त्यांच्या सुट्यांचेदेखील मॉनेटरिंग करण्यात येणार आहे.शहरात गेल्या काही वर्षांत डेंग्यूचे रुग्ण वाढत असले तरी या वर्षांत जून-जुलै उजाडला असताना पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्या अल्प होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रकोप कमी असल्यांचे सांगून प्रशासनदेखील गाफील होते. मात्र नंतर झालेल्या पावसानंतर डेंग्यूचा त्रास वाढतच गेला. यंदा तर थेट नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरूच राहिल्याने गतवर्षीच्याच नव्हे तर आत्तापर्यंत सर्वांत जास्त रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत संशयित रुग्ण संख्या दोन हजारांपेक्षा अधिक झाली तर केवळ नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच रुग्ण संख्या ६६ वर गेली.दिवाळीनंतर आयुक्त विदेशात होते. त्यानंतर ते परतल्यानंतर त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य वैद्यकीय अधिकारीपद सतत प्रभारी अधिकाऱ्यांकडे दिले जात असल्याने या खात्याची अवस्था बिकट होत चालली आहे.मध्यंतरी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महापालिकेत बैठक घेतल्यानंतर आरोग्य विभागातील महत्त्वाची पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्तांना आरोग्य सचिवांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिकेस उपलब्ध करून देण्याचे आयुक्त गमे यांना मान्य केले होते त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीमुळे विलंब झाल्याने आता तातडीने अधिकारी प्रतिनियुक्तीवर मागवण्यात येईल, असे गमे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या सुट्या अधिकृतरीत्या आहेत का ते परस्पर गायब होतात याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.सभापती पुन्हा घेणार आढावाआरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात आरोग्य विभागाची बैठक घेतल्यानंतर त्यांनी फवारणी आणि औषध फवारणीच्या वेळा वाढवून देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार वेळ वाढविण्यात आली आहे. मात्र, एकदा बैठक घेतल्यानंतर प्रशासनाने काय कार्यवाही केली आहे, याबाबत पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रकोप कमी असल्यांचे सांगून प्रशासनदेखील गाफील होते.जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत रुग्ण संख्या दोन हजारांपेक्षा अधिक झाली तर केवळ नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच रुग्ण संख्या ६६ वर गेली.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाdengueडेंग्यू