इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करावीत

By Admin | Updated: February 9, 2015 01:36 IST2015-02-09T01:35:57+5:302015-02-09T01:36:20+5:30

इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करावीत

Large scale development works should be done in Igatpuri taluka | इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करावीत

इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करावीत

घोटी : इगतपुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करावीत अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदीप गुळवे, उपसभापती गोरख बोडके, पंचायत समितीचे सभापती गोपाळ लहांगे, उपसभापती पांडुरंग वारुंगसे यांनी आज घोटी येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुडे यांनी रविवारी टाके घोटी येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी स्थानिक नेत्यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
निवेदनात पंचायत समिती स्तरावरील जॉइंट सह्यांचे अधिकार सभापती व गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात यावे त्याचप्रमाणे तालुक्यातील विविध विभागांतील रिक्त पदे भरण्यात यावी, नियुक्तीवर असलेले कर्मचारी मूलस्थानावर राहावे, तालुक्यातील ११५ अंगणवाडी इमारतींना मंजुरी देण्यात यावी. आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)

Web Title: Large scale development works should be done in Igatpuri taluka