शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त तहहयात?

By admin | Updated: September 27, 2015 00:19 IST

घटनादुरुस्तीचा घाट : दहा वर्षे मुदतीचे कलम वगळणार

नाशिक : पंचवीस वर्षांपूर्वी खुद्द कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या घटनेत बदल करण्याचा घाट घालण्यात आला असून, तसा प्रस्ताव लवकरच धर्मादाय आयुक्तांकडे पाठवला जाणार आहे. प्रतिष्ठानच्या घटनेत असलेले विश्वस्तपदाच्या दहा वर्षे मुदतीचे कलम वगळण्याचा निर्णय या दुरुस्तीद्वारे घेतला जाणार आहे. दरम्यान, खुद्द तात्यासाहेबांनी तयार केलेल्या घटनेलाच नख लावणारा हा बदल कशासाठी, असा संतप्त सवाल शहराच्या सांस्कृतिक वर्तुळातून उपस्थित होत आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी विशिष्ट उद्देश व कार्य डोळ्यांसमोर ठेवून कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना केली. प्रतिष्ठानची घटना तात्यासाहेबांनी स्वत: लक्ष घालून तयार करवून घेतली. त्यात प्रतिष्ठानच्या विश्वस्तपदाचा कार्यकाळ पाच वर्षे असा निश्चित करण्यात आला. हा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला पुन्हा पाच वर्षांसाठी मुदतवाढ देता येते; मात्र एका व्यक्तीने दहा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर तिला विश्वस्तपदावर राहता येत नाही. प्रतिष्ठानवर ठरावीक व्यक्तींनी वर्षानुवर्षे ठाण मांडून राहू नये, नव्या व्यक्तींनाही कामाची संधी मिळावी, असा दूरगामी विचार करून तात्यासाहेबांनी घटनेत सदर कलम नमूद केले होते; मात्र प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक व विश्वस्त मंडळाने हे कलमच वगळण्याचा घाट घातला आहे. कर्णिक यांनी गेल्या आॅगस्ट महिन्यात प्रतिष्ठानच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. त्याला सभासदांनी मान्यता देऊन यासंदर्भात अध्यक्ष कर्णिक, आमदार हेमंत टकले व अ‍ॅड. विलास लोणारी यांची समिती गठित करण्यात आली होती. या समितीच्या दोन बैठका होऊन समितीने अहवाल सादर केला असून, त्यात सदर कलम वगळण्याची शिफारस केली आहे. हा अहवाल नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. विश्वस्तांनी त्याला मान्यता दिली असून, लवकरच यासंदर्भातील प्रस्ताव धर्मादाय आयुक्तांना पाठवला जाणार आहे. धर्मादाय आयुक्त याबाबत प्रक्रिया सुरू करून हरकती मागवतील. हरकती प्राप्त झाल्यास त्यावर सुनावणी होऊन निर्णय जाहीर केला जाईल. या सगळ्या प्रक्रियेला सहा ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. (प्रतिनिधी)