यावर्षीही रंगणार कुर्तकोटी संगीत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:45 PM2019-11-12T23:45:47+5:302019-11-13T00:04:08+5:30

दोन वर्षांपासून शंकराचार्य न्यासतर्फे कुर्तकोटी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही या संगीत महोत्सवाचे आयोजन १६ व १७ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती कुर्तकोटीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बापू जोशी यांनी दिली. शंकराचार्य संकुलामधील सिंधूताई मोगल ग्रंथालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 Kurtakoti Music Festival will be held this year too | यावर्षीही रंगणार कुर्तकोटी संगीत महोत्सव

यावर्षीही रंगणार कुर्तकोटी संगीत महोत्सव

Next

नाशिक : दोन वर्षांपासून शंकराचार्य न्यासतर्फे कुर्तकोटी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही या संगीत महोत्सवाचे आयोजन १६ व १७ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती कुर्तकोटीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बापू जोशी यांनी दिली. शंकराचार्य संकुलामधील सिंधूताई मोगल ग्रंथालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शनिवार, १६ नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता महोत्सवाच्या प्रथम सत्रात पंडित जसरास यांच्या शिष्या अंकिता जोशी यांचे गायन होईल, तर यासाठी त्यांना रामकृष्ण करंबेळकर व सुधांशू घारपुरे साथसंगत करतील. तसेच यानंतर पद्मश्री सतीश व्यास यांचे संतूरवादन होईल. त्यांना मुकुंदराज देव साथसंगत करतील तसेच रविवार, १७ नोव्हेंबरला सकाळी ९.३० वाजता दुसऱ्या सत्रात अभिषेक बोरकर यांचे सरोदवादन होईल. यानंतर धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांचे गायन होणार आहे. त्यांना प्रताप आव्हाड पखवादाने साथसंगत करतील. तर महोत्सवाचे तिसरे आणि समारोपाचे सत्रात यादिवशी सायंकाळी ६ वाजता पद्मभूषण पं. बुधादित्य मुकर्जी यांच्या सतार वादनाच्या कार्यक्रमाने होणार असल्याची माहिती आयोजकांमार्फत देण्यात आली. यावेळी न्यासचे अध्यक्ष डॉ. आशिष कुलकर्णी, कार्यवाह प्रमोद भार्गवे, अभिजित केळकर, अ‍ॅड. मनीष चिंधडे आदी उपस्थित होते.
मागील वर्षी झालेल्या संगीत महोत्सवाला भरभरून दाद मिळाल्यानंतर महोत्सवाच्या दुसºयावर्षी या महोत्सवात पाच नामवंत कलाकार यासाठी उपस्थित राहणार आहेत. या कलाकारांमध्ये एक पद्मश्री व दुसरे पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी आहेत.

Web Title:  Kurtakoti Music Festival will be held this year too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.