खरातच्या धनादेशांचे बनावट खात्यांशी कनेक्शन; आर्थिक स्रोत लपवण्यासाठी केली जात होती शक्कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2026 08:43 IST2026-05-04T08:43:03+5:302026-05-04T08:43:34+5:30
सातव्या गुन्ह्याचा तपास करताना एसआयटीला खरातच्या कार्यालयातून दोन महिलांच्या नावे असलेले मोठ्या रकमेचे धनादेश मिळून आले होते. संबंधित व्यवहार पूर्ण होण्यासाठी खरात पीडितांची कागदपत्रे ताब्यात घेऊन नंतर कोऱ्या धनादेशाची मागणी करीत असे.

खरातच्या धनादेशांचे बनावट खात्यांशी कनेक्शन; आर्थिक स्रोत लपवण्यासाठी केली जात होती शक्कल
नाशिक : भाेंदू अशोक खरातच्या कार्यालयासह त्याच्या घरातून एसआयटी आणि ईडीने काही धनादेश जप्त केल्याचे तपासात पुढे आले असून, पीडितांच्या नावावर असलेल्या यातील काही धनादेशांचे विश्लेषण करण्यात तपास पथकाला यश आले आहे.
सातव्या गुन्ह्याचा तपास करताना एसआयटीला खरातच्या कार्यालयातून दोन महिलांच्या नावे असलेले मोठ्या रकमेचे धनादेश मिळून आले होते. संबंधित व्यवहार पूर्ण होण्यासाठी खरात पीडितांची कागदपत्रे ताब्यात घेऊन नंतर कोऱ्या धनादेशाची मागणी करीत असे. धनादेश आणल्यानंतर खरात त्याच्या हाताने रक्कम टाकत असे. त्यानंतर ज्याच्या नावावर धनादेश त्याची साक्षरी घेऊन हा धनादेश बँकेत जमा करून पैसे आपल्या खात्यावर वर्ग करीत असे. चोरी लपविण्यासाठी खरात त्याने उघडलेल्या बनावट बँक खात्यात पैसे अधिकाधिक वेळा ट्रान्सफर करीत ईडीच्या तपासात समोर आले आहे.
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
बँक खात्यातील मूळ स्रोत लपविण्याचा प्रयत्न
भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने खरातची तीन बँक खाती सील केली आहेत. या खात्यांमधील प्रत्येक व्यवहाराचे बारकाईने परीक्षण करण्यात येत असून, मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती समोर येत आहे.
विविध खात्यांमधील पैसे वारंवार ट्रान्सफर करून मूळ स्रोत लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तपास यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या खात्यांमधून झालेल्या पैशांच्या देवाणघेवाणीचा तपशील मागवण्यात आला असून, व्यवहारांची साखळी तपासली जात आहे. विशेष म्हणजे, खरातची पत्नी कल्पना हिच्या खात्यावरही कोट्यवधी रुपयांची रक्कम वर्ग झाल्याचे आढळले आहे.