कालिका मंदिर ट्रस्टतर्फे ५४ पत्रकारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST2021-01-08T04:41:48+5:302021-01-08T04:41:48+5:30

नाशिक : कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त लोकमतचे ...

Kalika Mandir Trust felicitates 54 journalists | कालिका मंदिर ट्रस्टतर्फे ५४ पत्रकारांचा सत्कार

कालिका मंदिर ट्रस्टतर्फे ५४ पत्रकारांचा सत्कार

नाशिक : कालिका देवी मंदिर ट्रस्ट, क्रीडा साधना आणि डी. एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनानिमित्त लोकमतचे पेठ प्रतिनिधी रामदास शिंदे यांच्यासह ५४ पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून धर्मादाय आयुक्त ज. पा. झपाटे, याचबरोबर जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, सचिव डॉ. प्रतापराव कोठावळे, क्रीडा संघटक अशोक दुधारे आदी मान्यवर उपस्थित होते. नाशिक जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये पत्रकारांची भूमिका पार पडत असलेल्या लोकमतच्या रामदास शिंदे यांच्यासह अन्य पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तसेच हेमंत भोसले यांना कालिका देवी मंदिराचे संस्थापक कै. कृष्णराव चिमणराव कोठावळे-पाटील यांच्या स्मरणार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Kalika Mandir Trust felicitates 54 journalists