शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास कलामंदिर महापालिकाच चालविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:17 IST

शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. याशिवाय तारखा विक्रीसारखे गैरप्रकार घडू नये यासाठी आॅनलाइनद्वारे नोंदणी बरोबरच आणखी काही नियम तयार करण्यात येणार आहेत.

नाशिक : शहराची सांस्कृतिक वास्तू असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर आता त्याचे खासगीकरण करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव असला तरी हे नाट्यगृह महापालिकाच चालविणार आहे. केवळ स्वच्छता तसेच अन्य तांत्रिक बाबी ठेकेदारामार्फत चालविल्या जाणार आहेत. याशिवाय तारखा विक्रीसारखे गैरप्रकार घडू नये यासाठी आॅनलाइनद्वारे नोंदणी बरोबरच आणखी काही नियम तयार करण्यात येणार आहेत.गेल्या काही महिन्यांपासून महाकवी कालिदास मंदिराच्या खासगीकरणाचा मुद्दा गाजत आहे. महापालिकेचे कालिदास कलामंदिर ही शहरवासीयांची सांस्कृतिक वास्तू आहे. गेल्या काही वर्षांत कालिदासची अवस्था बिकट होत चालली होती. त्यामुळे रंगकर्मी नाराज होते. केवळ स्थानिक कलावंतच नाही तर मोहन जोशी तसेच प्रशांत दामले यांसारख्या मान्यवर कलावंतांनीदेखील महापालिकेचे वाभाडे काढले होते. त्यानंतर स्मार्ट सिटी कंपनीने या कलामंदिराच्या विषयाला हात घातला.  गेल्या वर्षभरापासून महापालिकेने कलामंदिराचे नूतनीकरण सुरू असून, आता ते पूर्ण झाले आहे. दरम्यान, मध्यंतरी स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत कालिदास कलामंदिराचे खासगीकरण करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली त्यामुळे नाट्यप्रेमींमध्ये अस्वस्थता आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने यासंदर्भात लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन विरोध करण्यात आला. त्याचप्रमाणे अन्य रंगकर्मी तसेच सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित मान्यवरांच्या भावना ‘लोकमत’ने मांडल्या होत्या.  आयुक्तांनी या कलामंदिराचे खासगीकरण न करता केवळ साफसफाईसह काही मर्यादित बाबींचे खासगीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले असून, पूर्णत: खासगीकरण केले जाणार नाही, असा दिलासा त्यांनी दिला आहे.दरम्यान, ‘कालिदास’मध्ये अन्य राज्यातील अन्य नाट्यगृहांप्रमाणे तारखा विक्रीचा धंदा होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने आता आॅनलाइन बुकिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय तीन महिन्यांपेक्षा अधिक पुढील महिन्याची आगाऊ नोंदणी करता येणार नाही. बुकिंग करताना सर्व रक्कम भरणे आवश्यक अशा प्रकारची एक नियमावलीदेखील तयार करण्यात येणार असून, त्यामुळे गैरप्रकारांना आळा घालणे शक्य आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका