शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जीवनावश्यक साहित्य मिळाल्याने लाेककलावंतांचा आनंद द्विगुणित - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:12 IST

पेठ : तालुक्यातील कडवईपाडा या दुर्गम भागातील सुविधांपासून वंचित असलेल्या ५० लोककलावंतांना किराणा व सुरक्षा साहित्य वाटप ...

पेठ : तालुक्यातील कडवईपाडा या दुर्गम भागातील सुविधांपासून वंचित असलेल्या ५० लोककलावंतांना किराणा व सुरक्षा साहित्य वाटप करण्यात आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. या भागातील जुन्या जाणत्या परंपरागत लोककला जोपासणाऱ्या कलावंतांना कोरोना काळात रोजगार नव्हता, तसेच मोठ्या प्रतिकूल स्थितीत हे लोककलावंत आपले जीवन जगत होते. त्यांना या अडचणीत साहाय्य व्हावे, यासाठी कोरोनाच्या नियमांचे पालन करून हा उपक्रम घेण्यात आल्याचे माया खोडवे यांनी सांगितले. दुर्गम नाशिक, त्रंबकेश्वर, पेठ तालुक्यातील आदिवासी पट्ट्यात हजारो लोककलावंत आहेत. त्यांचे सण, उत्सव, विवाहात, मिरवणुकीत असणारे सांस्कृतिक कार्यक्रम कोरोना काळात पूर्ण बंद आहेत. यात कलगी - तुरा, पावरी वादक, मृदुंग, तबला, ढोल, पेटी, वाद्य वादक, नाच्या, झिलक्या, कणातीकार, गावठी तमाशा, बोहाडे अशा धार्मिक,

अध्यात्मिक,

सामाजिक स्तरावर

लोककलेचा वारसा चालवणारे हजारो लोककलावंत आहेत. शासनाचे मानधन मिळत नाही. त्यात कुठले कामही या काळात मिळत नसल्याने या लोककला अस्ताला चालल्या आहेत. या कला आजच्या इंटरनेट युगात टिकवल्या पाहिजे म्हणून दुर्गम भागातील कलावंतांना मिळणारी मदत म्हणजे या कलावंतांचा उत्साह द्विगुणित करणारी आहे, असे या भागातील कलावंत हभप जगदीश महाराज जाधव यांनी सांगितले. याप्रसंगी लोककलावंतांनी आपल्या लोककला सादर केल्या. यावेळी उपस्थित कलावंतांना किराणा साहित्यासह, हात धुण्यासाठी साबण, मास्कही देण्यात आले.

यावेळी आनंद पगारे, राम खुर्दळ, विष्णू खैरनार, जगदीश महाराज जाधव यांसह लोककलावंत यावेळी उपस्थित होते. याकामी प्रवीण कोरडे यांचीही साथ लाभली.

----------------

ग्रामीण भागात विशेषतः आदिवासी दुर्गम भागात परंपरागत लोककलेचा वारसा जोपासणारे अनेक कलावंत आहेत. त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही. त्यांच्या त्यागाची जाणीव म्हणून लोककलावंतांना किराणा वाटप केला. याआधीही दुर्गम भागातील महिला, विधवा महिलांच्या कुटुंबाना असे किराणा साहित्याचे वाटप केले होते. लुप्त होत चाललेल्या मराठी लोककला जपणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्यासाठी हा अल्प प्रयत्न.

- आनंद पगारे, नाशिक

----------------------

कडवईपाडा, ता. पेठ येथील दुर्गम भागातील लोककलावंतांना किराणा साहित्य, मास्क, साबण वाटप करतांना समुदाय पत्रकार माया खोडवे, आनंद पगारे, राम खुर्दळ आदी. (१५ पेठ २)

150721\595915nsk_2_15072021_13.jpg

१५ पेठ २