शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार बीएलओंवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 01:11 IST

: निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी निवडणूक अधिका-यांना दिले.

नाशिक : निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम करण्यास नकार देणाऱ्या बीएलओंवर अगोदर निलंबनाची नोटीस द्या त्यानंतरही त्यांनी कामकाज करण्यास नकार दिला तर थेट फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा, असे आदेश जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन यांनी निवडणूक अधिकाºयांना दिले. त्याचबरोबर काम करून घेण्यास अपयशी ठरणाºया अधिकाºयांची वेतनवाढ रोखण्याची तंबीही त्यांनी दिली.  आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले असून, त्यात मतदाराचे रंगीत छायाचित्र गोळा करणे, दुबार मतदाराचे नाव वगळणे, प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन नमुना १ ते ८ मधील माहिती गोळा करणे आदी कामांचा समावेश असून, जून महिन्यातच सदरची कामे पूर्ण करणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, देवळाली या सहा मतदारसंघांचे काम खूपच कमी झाल्याने सोमवारी जिल्हाधिकाºयांनी या मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाºयांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाºयांना जाब विचारण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देतानाच, काम न करणाºया बीएलओंना अगोदर निलंबनाच्या नोटिसा बजावण्यात याव्यात, त्याला जर प्रतिसाद दिला नाही तर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १०५० कलम ३२ अन्ये आणि लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ मधील व भारतीय दंड संहिता कलम १८७ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी बीएलओ म्हणून नेमलेले नाशिक महापालिकेचे शिक्षक व अंगणवाडी सेविका काम करीत नसल्याची तक्रार करण्यात आल्यावर जिल्हाधिकाºयांनी बैठकीतूनच महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोन करून कर्मचारी उपलब्ध करून देण्याची सूचना केली. त्यावर तातडीने महापालिकेचे उपायुक्त फडोळ, बच्छाव व प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेऊन कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे मान्य केले.म्हणून जिल्हाधिकारी संतापलेराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दोनच दिवसांपूर्वी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे राज्यातील सर्वच जिल्हाधिकाºयांशी संवाद साधला असता, त्यावेळी घेण्यात आलेल्या कामाच्या आढाव्यात नाशिक जिल्ह्याचे काम ६९ टक्केच झाल्याने अश्विनकुमार यांनी जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन यांना चांगलेच फैलावर घेतले. नाशिकचे काम समाधानकारक नसल्याचा शेराही त्यांनी मारला. नाशिकप्रमाणे ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, रायगडच्या जिल्हाधिकाºयांनाही यावेळी अश्विनकुमार यांनी जाब विचारला. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्हाधिकाºयांनी सोमवारी बैठक घेऊन स्वत:चा राग मतदार नोंदणी अधिकाºयांवर काढला.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय