शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

मंगळ मोहिमेमुळे भारताचा जगात दबदबा

By admin | Updated: September 29, 2014 00:32 IST

सुरेश नाईक : ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमात प्रतिपादन

नाशिक : भारताने यशस्वी केलेली मंगळ मोहीम जगभरात एक आदर्श मोहीम ठरली असून, अमेरिकेच्या तुलनेत केवळ दहा टक्के खर्चातच भारताने ही मोहीम यशस्वी केल्याने या क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण झाला असल्याचे प्रतिपादन अवकाश शास्त्रज्ञ सुरेश नाईक यांनी केले. ‘लेखक तुमच्या भेटीला’ उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात शेवटचे पुष्प गुंफताना ते ‘भारताच्या चंद्र आणि मंगळ मोहिमा’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, मंगळाला गवसणी घालण्यासाठी आत्तापर्यंत जगभरातून ५१ मोहिमा राबविल्या गेल्या आहेत. त्यापैकी बहुतांश मोहिमा अयशस्वीच झाल्या आहेत; परंतु कमी इंधनात, कमी खर्चात आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाल्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे भारताचे नाव या क्षेत्रात आता अग्रस्थानी असून, उपग्रह सोडण्यासाठी आपल्याकडे इतर देशांच्या रांगा लागल्या आहेत. चंद्र मोहिमेतही भारताला २००८ साली पहिल्याच प्रयत्नात यश लाभले होते; परंतु मंगळापर्यंत जाण्यासाठी ज्या क्षमतेचा अग्निबाण लागतो तो आपल्याकडे नसतानाही भारतीय शास्त्रज्ञांनी कमी क्षमतेचा अग्निबाण वापरीत हे अवघड काम सहजसाध्य केले. मंगळ पृथ्वीच्या जवळ येण्याचा कालावधी ३६ महिन्यांतून एकदाच येतो. त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठीही भारताकडे केवळ १८ महिनेच शिल्लक होते. त्या काळातच भारतीय शास्त्रज्ञांनी सर्व काम फत्ते करून दाखवित आपला उपग्रह मंगळाच्या कक्षेत यशस्वीरीत्या सोडला, अशी माहितीही नाईक यांनी दिली. यावेळी नाईक यांनी अग्निबाणाची निर्मिती करण्यापासून ते ग्रहांवर उपग्रह उतरविण्यापर्यंत उपग्रहाचा प्रवास कसा होतो हे चलचित्राद्वारे दाखविले आणि उपस्थितांना अवकाशाची सफर घडविली. यावेळी व्यासपीठावर मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे, बाळासाहेब वाघ, नेमीचंद पोद्दार, प्रा. गिरीश पिंपळे आदि उपस्थित होते. वसंत खैरनार यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले.