शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

भारताची प्रगती वेगाने

By admin | Updated: January 19, 2017 00:48 IST

केशव उपाध्ये : त्र्यंबकेश्वर येथे कर्मचाऱ्यांचा सत्कार

त्र्यंबकेश्वर : केंद्रातील मोदी सरकारने सर्वसामान्यांना पत देण्याचे काम केले आहे. आपला देश वेगाने प्रगतीकडे जात असून, त्यामध्ये सरकारने राबविलेल्या योजनांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केले.युवा सप्ताहानिमित्त ‘प्रगत भारत, डिजिटल भारत’ या विषयावर व्याख्यान देताना, तसेच सिंहस्थ कुंभमेळा यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान देणाऱ्या सफाई कामगार, स्वयंसेवक, देवस्थान कर्मचारी, अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या सत्कारप्रसंगी जाहीर कार्यक्रमात उपाध्ये बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चा त्र्यंबकेश्वरच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार अपूर्व हिरे, अ‍ॅड. श्रीकांत गायधनी, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, तालुकाध्यक्ष कौशल्या लहारे, शहराध्यक्ष श्याम गंगापुत्र, महिला आघाडी शहराध्यक्ष माधुरी वैभव जोशी, उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव उपस्थित होते. कार्यक्र माची सुरुवात भारतमाता, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा-पूजनाने झाली. उपाध्ये यांचा सत्कार युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर, हिरे यांचा सत्कार सरचिटणीस भावेश शिखरे, जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गायधनी यांचा सत्कार मयूर वाडेकर, लढ्ढा यांंचा सत्कार सरचिटणीस अमित झोले, तालुकाध्यक्ष कौशल्या लहारे यांचा सत्कार अभय सरडे, शहराध्यक्ष श्यामराव गंगापुत्र यांचा सत्कार उपाध्यक्ष रोहन शुक्ल व उपनगराध्यक्ष अभिजित काण्णव यांचा सत्कार चिटणीस भूषण दाणी यांनी केला. युवा मोर्चा अध्यक्ष सुयोग वाडेकर यांनी प्रास्ताविक, तर सुयोग देवकुटे यांनी सुत्रसंचालन केले. (वार्ताहर)