‘अपक्ष’ तरीही दुसऱ्यांदा उपसभापती..

By Admin | Updated: September 16, 2014 00:22 IST2014-09-15T21:04:30+5:302014-09-16T00:22:40+5:30

‘अपक्ष’ तरीही दुसऱ्यांदा उपसभापती..

'Independent' still a second time sub-book | ‘अपक्ष’ तरीही दुसऱ्यांदा उपसभापती..

‘अपक्ष’ तरीही दुसऱ्यांदा उपसभापती..

 

मालेगाव
अपक्ष विजय संपादन केल्यानंतर उपसभापति-पदाचा मान तोही सलग दुसऱ्यांदा मिळविण्याची किमया साधली आहे निमगाव गणाच्या सदस्य अनिता दीपक अहिरे यांनी. पक्षातर्फे निवडणूक जिंकूनही अनेकांना मानाच्या पदांपासून वंचित रहावे लागले असल्याचे चित्र मालेगाव पंचायत समिती सभापती- उपसभापती निवडणुकीत आज दिसून आले.
निवडणुकीत एक एक मताला कशी किंमत असते त्या मतांचे मोल काय असते याचा प्रत्यय नवनिर्वाचित उपसभापती सौ. अहिरे यांनी आज आणून दिला. गत अडीच वर्षापूर्वी निमगाव गणातून अपक्ष उमेदवारी करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या निर्मला मधुकर हिरे या बलाढ्य व प्रस्थापित उमेदवाराचा पराभव करीत अहिरे प्रथमच विजयी होत तालुक्याच्या राजकारणात नवा इतिहास घडविला होता. या जोरावर त्यांनी उपसभापतिपद पटकाविले होते. एका सामान्य कुटुंबातील स्त्रीला हा बहुमान मिळाला होता.
मात्र राजकारणात जशी संधी येईल त्याचे सोने जो करेल तोच सत्ता मिळवेल. याचा प्रत्यय सौ. अहिरे समर्थकांनी याही निवडणुकीत आणून दिला. शिवसेनेकडे असलेले सात सदस्यांचे संख्याबळ व विरोधकांकडे असलेले सहा मतदार यात अपक्ष असलेल्या सौ. अहिरे यांच्या मताला मोठा भाव आला. सत्ताधारी शिवसेनेने आपल्याकडेच सत्ता ठेवण्याचा चंग बांधला होता. सौ. अहिरे यांना पुन्हा उपसभापतिपदाची उमेदवारी देत त्यांना विजयी केले व तालुक्यात
सलग दुसऱ्यांदा उपसभापती होण्याचा मान त्यांना मिळाला. ३२ वर्षी सौ. अहिरे या निमगाव येथील समता परिषदेचे तरुण कार्यकर्ते दीपक अहिरे यांच्या सुविद्य पत्नी.

Web Title: 'Independent' still a second time sub-book