शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

कांदाप्रश्नी स्वाभिमानी संघटनेचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: June 25, 2014 00:15 IST

कांदाप्रश्नी स्वाभिमानी संघटनेचे ठिय्या आंदोलन

नाशिक : केंद्र शासनाने कांद्याचे निर्यातमूल्य ३०० डॉलर केले असून, त्याचा निषेध करून ते शून्य डॉलरवर आणावे आणि जिल्हा बॅँकेकडून होत असलेल्या कर्जवसुलीपोटी जप्तीची मोहीम तातडीने रोखावी या प्रमुख मागण्यांचे निवेदन घेऊन आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन पुकारत, जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतल्याने वातावरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा न काढता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याकडे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात निवेदन सादर केले. सदरच्या निवेदनानुसार गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या गारपिटीमुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याचे बियाणे मिळणेही मुश्किल झालेले असताना केंद्र सरकारने कांद्याचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहावेत, यासाठी निर्यातमूल्य ३०० डॉलर्स केले असून, ते शून्य डॉलर्स करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यास महसूल कर्मचाऱ्यांकडून विलंब केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाची आर्थिक मदत मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. जिल्हा बॅँकेकडूनही थकबाकीदार शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई केली जात असून ती थांबवावी, तसेच कर्ज भरणा केलेल्या शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज मंजूर करावे. सदरच्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी दिला. यावेळी संघटनेचे दीपक पगार, बाबा गोडसे, बापू जाधव, श्रावण देवरे, विजय मोरे, अभिमन पगार, सिकंदर मोरे, रवींद्र शेवाळे आदिंसह शेतकरी उपस्थित होते. ... तर आंदोलनशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्याशी चर्चा सुरू असताना कृषी विभाग व जिल्हा बॅँकेचे अधिकारी अनुपस्थित असल्याने आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाहीत तोपर्यंत कार्यालयातच ठिय्या आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे पालवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना कार्यालयात पाचारण केले आणि त्यानंतर चर्चा होऊन आंदोलन संपले.