शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक खर्चावर आयकरची नजर

By admin | Updated: January 20, 2017 01:24 IST

निरीक्षक नियुक्त : आयोगाकडून पहिल्यांदाच प्रयोग

नाशिक : निवडणूक काळात प्रचंड प्रमाणात होणारा पैशांचा वापर रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने आता महापालिका निवडणुकीत उमेदवारांकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर थेट आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत वॉच ठेवण्याचा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी आयोगाने त्यासाठी आयकर खात्यातील पाच अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे, उमेदवार आता थेट आयकर खात्याच्या कचाट्यात सापडणार आहे. महापालिकेचे आयुक्त तथा मुख्य निवडणूक अधिकारी अभिषेक कृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रक समितीची बैठक झाली. यावेळी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, आयकर खात्याचे प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणुकीत पैशांचा वारेमाप वापर होत असतो. त्याला पायबंद घालण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच आयकर खात्याच्याच अधिकाऱ्यांची नियुक्ती करत वेगळा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. राज्यातील दहाही महापालिकांच्या निवडणुकीसाठी े पथक नियुक्त केले आहे. त्यात नाशिक महापालिकेसाठी आयकर खात्यातील वरिष्ठ अधिकारी धुळे येथील बी. एस. झाला, मालेगाव येथील संजयकुमार सिंग, औरंगाबाद येथील अनिमेश नासकर, जळगाव येथील एस. एच. मेंढे, औरंगाबाद येथील मनीषकुमार सोनी यांचा समावेश आहे. सदर निरीक्षक उमेदवारांच्या खर्चावर नजर ठेवणार असून, बॅँक उलाढालीवरही त्यांचे लक्ष राहणार आहे. (प्रतिनिधी)