शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीचोरीविरुद्ध पाटबंधारे खाते आक्रमक

By admin | Updated: March 12, 2017 01:29 IST

नाशिक : पालखेड पाटबंधारे कार्यालयांतर्गंत येणाऱ्या उर्ध्व गोदावरीच्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगाव डावा कालव्यातून सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याची तयारी सुरू झाली आहे.

नाशिक : पालखेड पाटबंधारे कार्यालयांतर्गंत येणाऱ्या उर्ध्व गोदावरीच्या ओझरखेड डावा कालवा, पुणेगाव डावा कालव्यातून सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याची तयारी सुरू झाली असून, पाणीवापर संस्थांसाठी सोडण्यात येणाऱ्या या पाण्याच्या संभाव्य चोरी विरुद्ध पाटबंधारे खात्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे. कालव्यातील पाणी चोरण्यासाठी डोंगळे टाकल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याबरोबरच जादा पाणी लागणाऱ्या पिकांना पाणी न देण्याचे तसेच पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाणार आहे. ओझरखेड, पुणेगाव डावा कालवा तसेच ओझरखेड, तीसगाव व पुणेगाव धरणाच्या फुगवट्यातील परिसर, जांबुटके व खडकमाळेगाव प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाणीवापर संस्थांसाठी उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्यात येणार असल्याने त्याच्या तयारीचा भाग म्हणून पाणीवापर संस्थांनी येत्या २० मार्चपर्यंत मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन पालखेड पाटबंधारे विभागाने केले आहे. तथापि, यंदा पाण्याची उपलब्धता व मागणीचा विचार करता सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या या पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी पाटबंधारे खाते सक्रिय झाले आहे. पिण्याच्या पाण्याचा कोणताही प्रकारे गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित पाणीवाटप संस्थांवर सोपविण्यात आली असून, ज्या पिकांना अधिक पाणी लागते अशा पिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याने पिकांचे नुकसान झाल्यास पाटबंधारे खाते त्यास जबाबदार राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. ज्या संस्थांनी थकबाकी भरली असल्यास त्यांनाच पाणी दिले जाईल, शिवाय नादुरुस्त चाऱ्यांमधून पाणीपुरवठा केला जाणार नसल्याने पाणीवापर संस्थांनी चाऱ्या सुस्थितीत ठेवाव्यात, पाण्याचा अपव्यय झाल्यास त्याला पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही शिवाय ज्या पिकांसाठी पाण्याची मागणी करण्यात आली आहे त्याच पिकासाठी पाण्याचा वापर व्हावा, मागणी न केलेल्या पिकासाठी पाण्याचा वापर केल्यास पाणीवापर अनधिकृत असल्याचे समजून पिकांचा पंचनामा केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. कालव्यातून पाणी सोडल्यास इलेक्ट्रीक मोटारी अथवा आॅईल इंजिन ठेवून डोंगळ्याच्या माध्यमातून पाणी चोरीचा कोणी प्रयत्न केल्यास महाराष्ट्र सिंचन कायद्यान्वये साहित्य जप्त करण्याचेही पाटबंधारे खात्याने ठरविले आहे.