शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीतील सांडपाणी तत्काळ रोखा

By admin | Updated: January 2, 2015 00:41 IST

पालकमंत्री : सिंहस्थानंतर कायमस्वरूपी तोडगा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आलेला असताना कोट्यवधी भाविकांच्या धार्मिक व भावनेचा प्रश्न असलेल्या गोदावरीचे प्रदूषण तत्काळ रोखतानाच त्यात सोडले जाणारे सांडपाणी युद्धपातळीवर बंद करा व सिंहस्थानंतर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आदेश पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनास दिले. सिंंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त जिल्हास्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. गोदावरीत सांडपाणी टाकले जात असतानाही प्रशासन पाण्याचे नमुने तपासून पाणी योग्य असल्याचे सांगितले जाते, जगातील कोट्यवधी भाविक गोदावरीचे पाणी पवित्र म्हणून तीर्थ प्राशन करतात. वास्तवात भाविकांच्या धार्मिक व भावनेचा या प्रश्नावर यापूर्वीच तोडगा काढायला हवा होता मात्र तसे झाले नसले तरी, विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ युद्धपातळीवर येत्या दोन महिन्यांत गोदावरीत कोणत्याही परिस्थितीत सांडपाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेश देऊन सिंहस्थानंतर त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात यावा, अशी सूचनाही पालकमंत्री महाजन यांनी केली. साधुग्रामसाठी जमीन संपादन करण्याच्या प्रश्नावरही पालकमंत्र्यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली.