शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष

By admin | Updated: September 27, 2016 00:47 IST

आश्रमशाळा प्रशासन : पेठ येथील प्रकाराने पालक भयभीत

पेठ : येथील मविप्रच्या वांगणी येथील आश्रमशाळेत पहिलीच्या वर्गातील निवासी असणाऱ्या मुलीच्या डोक्याला जबर जखम होऊनही शाळा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सदर मुलीस वेदना सहन करत वास्तव्य करण्याचा प्रकार उघडकीस आला. पेठच्या आश्रमशाळेत शिक्षण घेणारी मीना रामदास मोहंडकर या विद्यार्थिनीच्या डोक्यात मोठी जखम होऊन त्यामध्ये अक्षरशा: जंतू तयार झालेले असल्याने तिला उपचारासाठी पेठच्या ग्रामीण रुग्णालयात शाळेच्या कामाठ्याने दाखल केल्याची खबर जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य व सेना तालुकाध्यक्ष भास्कर गावित यांना मिळाल्याने त्यांनी थेट रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थिनीची भेट घेतली.तिच्या डोक्यावरील जखमेत मोठा खड्डा पडून त्यातून जिवंत अळ्या पाहून प्रारंभी ते भावनावश झाले. मात्र उपचार सुरू असताना लहान जिवाच्या प्राणांतिक वेदना बघून संतप्त झालेल्या गावित यांनी कार्यकर्त्यांसह थेट आश्रमशाळेस भेट दिली. यावेळी आश्रमशाळेतील अनेक त्रूटी निर्दशनास आल्याने त्याबाबत आपण जिल्हा परिषदेत व शासनाकडे दाद मागणार असल्याचे जि.प. सदस्यांनी सूतोवाच केले असल्याने किमान या प्रसंगाने तरी विद्यार्थ्यांच्या सुविधांमध्ये सुधारणा होणार की पुन्हा त्याच अग्निदिव्यास विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार हे काळच ठरवेल. यावेळी रामदास वाघेरे, रघुनाथ चौधरी, मोहन कामडी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) येथे एकूण ६४५ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यापैकी पहिली ते दहावीपर्यंतचे २६६ विद्यार्थी-विद्यार्थिनी निवासी आहेत. मात्र त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अधीक्षक , अधिक्षिका तसेच चौकीदार यांची पदे मंजूर असूनही भरण्यात आलेली नाहीत. शिक्षक अध्यापन करून वेळ मिळेल तसे विद्यार्थ्यांकडे लक्ष देत असल्याने डोक्यात जिवघेणी जखम झाली तरीही त्याकडे लक्ष देण्यास कुणास फुरसत नसल्याने कामाठीने पीडित मुलीस उपचारासाठी आणले.