शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मुदतठेवींची रक्कम न दिल्यास जिल्हा बॅॅँकेवर फौजदारी

By admin | Updated: April 27, 2017 02:10 IST

नाशिक : मजूर सहकारी संघाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत दोन कोटींची ठेवींची रक्कम अदा न केल्याने बॅँकेने जिल्हा मजूर संघाची फसवणूक केली आहे

नाशिक : जिल्हा मजूर सहकारी संघाची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत दोन कोटींची मुदतठेवींची रक्कम खात्यात असूनही, ती वेळीच अदा न केल्याने जिल्हा बॅँकेने जिल्हा मजूर संघाची फसवणूक केली आहे. या ठेवींची मुदत संपली असून, खात्यात रक्कमही शिल्लक आहे. येत्या १५ दिवसांत ही रक्कम जिल्हा बॅँकेने न दिल्यास जिल्हा बॅँकेवर फौजदारी कारवाई करू, असा इशारा जिल्हा मजूर सहकारी संघाचे अध्यक्ष प्रमोद मुळाणे यांनी दिला आहे.बुधवारी (दि. २६) यासंदर्भात जिल्हा मजूर संघाची भूमिका प्रमोद मुळाणे यांनी माध्यमांसमोर मांडली. यावेळी जिल्हा मजूर संघाचे संचालक राजेंद्र भोसले, शिवाजी रौंदळ, विठ्ठलराव वाजे, शशिकांत आव्हाड, माजी संचालक संजय चव्हाण, केदा अहेर आदि उपस्थित होते. जिल्हा मजूर संघांतर्गत असलेल्या सुमारे १३०० हून अधिक मजूर संस्थांचेही धनादेश वटत नसल्याने त्यांनी याबाबत मजूर संघाकडे तक्रारी केल्याचे प्रमोद मुळाणे व राजेंद्र भोसले यांनी सांगितले. मार्चअखेर केलेल्या कामांचे धनादेश जिल्हा परिषदेने संबंधित मजूर संस्थांना दिले असून, त्यांच्या खात्यावर रक्कम असूनही ती मिळत नसल्याने जिल्"ातील मजूर संस्थांचे संचालक हवालदिल झाले आहेत. जिल्हा बॅँकेत ठेवींच्या स्वरूपात ठेवलेल्या दोन कोटी रुपयांची रक्कम खात्यात असूनही, पुरेशी रक्कम नसल्याचे कारण देत धनादेश जिल्हा बॅँकेने परत पाठवून जिल्हा मजूर संघाची फसवणूक केली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेला जिल्हा मजूर संघाने ही मुदतठेवींची रक्कम येत्या १५ दिवसांत न दिल्यास यासंदर्भात फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे.