शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

घेईन तर स्थायी नाही तर उपाशी

By admin | Updated: April 15, 2017 01:07 IST

स्पर्धा : सदस्यांचा पक्षाला इशारा

नाशिक : येत्या रविवारी (दि.१६) होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत समिती खातेवाटपाबरोबरच विविध समित्यांवरील सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. सर्वच पक्षातील सदस्यांनी स्थायी समिती, बांधकाम समिती आणि त्याखालोखाल जलसंधारण समितीची मागणी केली आहे. अमुक एका समितीवर निवड करा, नाही तर कोणतीही समिती नको, असा इशारा भाजपा व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यांच्या गटनेत्यांना दिल्याचे समजते.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीवर आठ सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यात संख्याबळानुसार शिवसेनेचे सर्वाधिक २५ सदस्य असल्याने त्यांच्या कोट्यातून तीन सदस्यांची स्थायी समितीवर वर्णी लागण्याची चिन्हे आहेत, तर त्याखालोखाल संख्याबळ असलेल्या राष्ट्रवादी व भाजपाने प्रत्येकी दोन सदस्य स्थायीवर पाठविण्याची तयारी केली आहे. कॉँग्रेस किंवा अपक्षातून एक सदस्य स्थायी समितीवर जाऊ शकतो. भाजपाचे सहयोगी सदस्य स्वीकारलेल्या एका सदस्याने आपल्याला गटात विकासकामे करावयाची असून, आपली स्थायी समितीवर वर्णी लावण्यात यावी, अन्यथा आपल्याला कोणतीही समिती नको, असा पावित्रा घेतल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याची चर्चा आहे. त्यातच सातत्याने पक्षातून डावलेले जात असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या एका महिला सदस्यानेही आपली स्थायी समितीवर वर्णी लावण्यात यावी, अन्यथा आपण घरीच बसणे पसंत करू, असा टोकाचा इशारा पक्षाला दिल्याचे समजते. त्यामुळे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉँगे्रसच्या गटनेत्यांची स्थायी समितीवर वर्णी लागणे अशक्य असल्याची चर्चा आहे. बांधकाम व जलसंधारण समितीसाठी सदस्यांचा ओढा असल्याचे समजते. त्यामुळे रविवारी होणाऱ्या विशेष सभेत सदस्यांची समजून काढत गटनेत्यांच्या नाकीनव येणार असल्याचे कळते.