विविध क्षेत्रांतील जाणकारांनी मांडले विचार

By Admin | Updated: September 30, 2016 22:53 IST2016-09-30T22:51:30+5:302016-09-30T22:53:48+5:30

निफाड : जयकर व्याख्यानमाला उत्साहात निफाड

Ideologies made by experts from different fields | विविध क्षेत्रांतील जाणकारांनी मांडले विचार

विविध क्षेत्रांतील जाणकारांनी मांडले विचार

 निफाड : येथील श्री माणकेश्वर वाचनालयाच्या बहि:शाल शिक्षण केंद्र व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तीनदिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली. यात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मौलिक विचार मांडले. वैनतेय विद्यालयात डॉ. प्रसाद जोशी यांनी ‘चला जग जिंकूया’ या विषयावर पहिले पुष्प गुंफले. त्यांनी आपल्या व्याख्यानात संवाद म्हणजे काय? संवादाशिवाय आपण जगू शकत नाही, संवादासाठी भाषाशैली, देहबोली याची आवश्यकता यावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी वैनतेय विद्यालयाचे मुख्याध्यापक के. के. निकम होते. प्रास्ताविक दत्ता उगावकर यांनी केले. याप्रसंगी बहि:शाल शिक्षण केंद्राचे कार्यवाह आर. आर. दवते, तनवीर राजे, सुजाता तनपुरे, मालती वाघावकर, बाळासाहेब खालकर, नितीन बनसोडे आदि उपस्थित होते. दुसरे पुष्प सुषमा दुगड यांनी ‘हास्ययोग व आरोग्य’ या विषयावर निफाड इंग्लिश स्कूल येथे गुंफले. विद्यार्थ्यांची जीवनशैली कशी असावी, ते योग शिकवतो. हास्यामुळे आत्मविश्वास, सुसंवाद, एकाग्रता वाढीस लागते, असे दुगड यांनी सांगून हास्याचे विविध प्रकारांचे विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिके करून घेतली. अध्यक्षस्थानी निफाड इंग्लिश स्कूलचे पर्यवेक्षक साहेबराव वाघ होते. यावेळी वाचनालायचे अध्यक्ष मधुकर शेलार, संचालक तनवीर राजे, पी. पी. पवार, बाळासाहेब खालकर, तसेच बहि:शाल केंद्राचे कार्यवाह राहुल दवते उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Ideologies made by experts from different fields