निधीअभावी मजूर संस्थाचालकांची उपासमार

By Admin | Updated: April 2, 2016 00:06 IST2016-04-01T23:21:12+5:302016-04-02T00:06:47+5:30

निधीअभावी मजूर संस्थाचालकांची उपासमार

Hunger for the laborers of funds due to lack of funds | निधीअभावी मजूर संस्थाचालकांची उपासमार

निधीअभावी मजूर संस्थाचालकांची उपासमार

नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांची
कामे आणि त्यापोटी अदा करावयाच्या देयकांपोटी राज्य सरकारकडून निधी वितरण करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांची आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांची उपासमार होत असल्याचा आरोप नाशिक जिल्हा मजूर सहकारी संघाचे माजी संचालक दिलीप पाटील यांनी केला आहे.कळवण व देवळा तालुक्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अतिदुर्गम व ग्रामीण भागात रस्त्यांची व मोेऱ्यांची कामे करण्यात आली. त्यातील काही कामांना पूर्ण निधी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला, तर काही कामांना अत्यल्प निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. आज ना उद्या या कामांसाठी शासन स्तरावरून निधी उपलब्ध होईल, या अपेक्षेवर संबंधित मजूर संस्था संचालकांनी व सुशिक्षित बेराजगार अभियंत्यांनी ही कामे केली. मात्र मागील मार्च महिन्यात व या मार्च महिन्यात सलग या कामांसाठी निधीची तरतूदच करण्यात न आल्याने आता संबंधित मजूर संस्थाचालक व सुशिक्षित बेरोजगार अभियंते हवालदिल झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hunger for the laborers of funds due to lack of funds