शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

गोंदे फाट्यावर भीषण अपघात; एक गंभीर, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 00:17 IST

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर आणि इनोव्हा कार यांच्या झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून इनोव्हा कारमधील दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली .

ठळक मुद्दे या धडकेमुळे दोन्ही वाहने पलटी झाली.

नांदूरवैद्य : नाशिक-मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला फाटा येथे कंटेनर आणि इनोव्हा कार यांच्या झालेल्या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला असून इनोव्हा कारमधील दोन किरकोळ जखमी झाले. सदर घटना बुधवारी (दि.१४) रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडली .गोंदे फाटा येथे नाशिकहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर (क्र. एन.एल.०२, क्यू.२७६३) चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे दुभाजक तोडून समोरून मुंबईहून-नाशिककडे येत असलेल्या इनोव्हा कारला (क्र. एम.एच.१५, एच.एम.७१४९) जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दोन्ही वाहने पलटी झाली. या अपघातात कंटेनरचा लखन प्रितम सिंग (३२, रा.पंजाब) गंभीर जखमी झाला. गोंदेफाटा येथील जगद्‌गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेद्वारे जखमी चालकास लेखानगर येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. वाडिव-हे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी फड यांनी पंचनामा करून महामार्गावरील अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला करीत वाहतूक सुरळीत केली. महिंद्रा कंपनीचे सुरक्षा अधिकारी हरीश चौबे व अनिल नाठे यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. दोन आठवड्यांपासून मुढेगाव ते विल्होळी दरम्यान या राष्ट्रीय महामार्गावर अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली असून सुसाट वाहने चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAccidentअपघात