अग्र आनंद मेळ्यात ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2016 02:01 IST2016-09-26T02:00:10+5:302016-09-26T02:01:36+5:30

अग्रसेन जयंती : विविध स्पर्धा, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

Honor to senior socialists in Agra Anand Mela | अग्र आनंद मेळ्यात ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान

अग्र आनंद मेळ्यात ज्येष्ठ समाजबांधवांचा सन्मान

नाशिक : महाराज श्री अग्रसेन जयंतीनिमित्त आयोजित अग्र आनंद मेळ्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ समाजबांधवांना सन्मानित करण्यात आले. तसेच विविध विद्या शाखांमधील गुणवंतांनाही यावेळी गौरविण्यात आले.
अग्रवाल महिला मंडळ, युवक मंडळ आणि अग्रवाल सखी मंचाच्या वतीने विश्वास लॉन्स येथे या आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळ्याचे उद्घाटन रुख्मिणीदेवी सिंघानिया, संतोषराणी जैन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अग्रवाल सभेचे कार्याध्यक्ष किरण अग्रवाल, महामंत्री महेश अग्रवाल, विभागीय अध्यक्ष ताराचंद गुप्ता, जिल्हाध्यक्ष श्याम ढेडिया, अलका अग्रवाल आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
मेळ्यात महिला व युवकांचा फॅशन शो आदि स्पर्धा घेण्यात आल्या. युवा मंडळातर्फे रक्तदान शिबिरही घेण्यात आले. प्रेमा हिसारिया, अंकित अग्रवाल व प्रिती ढेडिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुनीता भतवाल व डॉ. ममता अग्रवाल यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी मोठ्या संख्यने समाजबांधव उपस्थित होते.
दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.३०) काठे गल्लीमधील नियोजित अग्रसेन भवनच्या ठिकाणी सायंकाळी ५ वाजेपासून फॅन्सी ड्रेस, नृत्य, रांगोळी, कलश सजावट आदि स्पर्धा होणार आहे. मुख्य जयंती सोहळा शनिवारी (दि.१) होणार असून, सकाळी रविवार कारंजा व महात्मानगर येथे माल्यार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सन्मानार्थी ज्येष्ठ
राधादेवी अग्रवाल, वासुदेव कारीवाला, सत्यनारायण चॉँद, ओ. पी. अग्रवाल, बनवारीलाल हिसारिया, शकुंतलादेवी अग्रवाल, भारतभूषण अग्रवाल, जगनलाल अग्रवाल, मंगतुराम सिंघानिया, आनंदीदेवी सिंघानिया, गंगाबिशन अग्रवाल, राजकुमार अग्रवाल या ज्येष्ठांना सन्मानित करण्यात आले.

 

Web Title: Honor to senior socialists in Agra Anand Mela