शहीद ठोक यांच्या कुटुंबियांना मदत

By Admin | Updated: September 23, 2016 01:09 IST2016-09-23T01:09:35+5:302016-09-23T01:09:55+5:30

शहीद ठोक यांच्या कुटुंबियांना मदत

Help the family of Shaheed Chokh | शहीद ठोक यांच्या कुटुंबियांना मदत

शहीद ठोक यांच्या कुटुंबियांना मदत


सिन्नर : कश्मिर खोऱ्यात दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या सिन्नर तालुक्यातल्या खडांगळी येथील शहीद संदीप ठोक यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाकडून १५ लाख रुपयांच्या मदतीला धनादेश देण्यात आला.
तहसीलदार मनोजकुमार खैरनार यांच्याहस्ते शहीद संदीप यांचे वडील सोमनाथ देवराम ठोक व विमलबाई यांना मुख्यमंत्री सहाय्यक निधीतून १५ लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे, सिन्नर बाजार समितीचे सभापती अरुण वाघ, पंचायत समिती सदस्य अलका मुरडनर, भाजपाचे शहराध्यक्ष पंकज जाधव, शिवसेना तालुकाप्रमुख दीपक खुळे, खडांगळीचे सरपंच ज्ञानेश्वर ठोक, सतिष कोकाटे, वडांगळीचे उपसरपंच नानासाहेब खुुळे, ज्ञानेश्वर चव्हाणके, योगेश ठोक, दत्ता कोकाटे, उत्तम खुळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर).

Web Title: Help the family of Shaheed Chokh