शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या याचिकेवर २७ एप्रिलला सुनावणी

By admin | Updated: March 31, 2017 00:54 IST

नाशिक : शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त या दोहोंना माहिती सादर करण्याचे आदेशित केले आहे

 नाशिक : विभागीय आयुक्तांनी शिवसेनेसोबत रिपाइंची गटनोंदणी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी (दि.३०) सुनावणी होऊन न्यायालयाने विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त या दोहोंना चार आठवड्यांत माहिती सादर करण्याचे आदेशित केले आहे. न्यायालयाने स्थायीच्या नियुक्तीप्रक्रियेला स्थगिती न दिल्याने भाजपाला दिलासा मिळाला असून, सभापतिपदाची निवडप्रक्रिया सुकर झाली आहे. आता पुढील सुनावणी २७ एप्रिलला होणार आहे. महापालिकेत शिवसेनेचे ३५ सदस्य निवडून आले आहेत. स्थायी समितीवर तौलनिक संख्याबळानुसार चार ऐवजी पाच सदस्य नियुक्त होण्यासाठी सेनेने विभागीय आयुक्तांकडे रिपाइंसह एकत्रित गटनोंदणीचा प्रस्ताव दिला होता. परंतु, शिवसेनेने अगोदरच स्वतंत्र पक्ष म्हणून गटनोंदणी केलेली असल्याने पुन्हा रिपाइंसोबत त्याची पुनरुक्ती करता येत नसल्याचे सांगत विभागीय आयुक्तांनी सेनेचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे स्थायी समितीवर ८-८ असे बलाबल न होता भाजपाचा बहुमताचा मार्ग मोकळा झाला. विभागीय आयुक्तांच्या या निकालाविरुद्ध शिवसेनेने तातडीने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली व गुरुवारी (दि.३०) होणाऱ्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्ती प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्यापुढे गुरुवारी सकाळी सुनावणी झाली. सुमारे दोन ते अडीच तास सुनावणी झाली. (प्रतिनिधी)