शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडून लॅपटॉप लांबविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:16 IST

---- पानटपरी फाेडून ५४ हजाराची सिगारेट लंपास नाशिक : भद्रकाली फळबाजारात असलेल्या लक्ष्मी पानटपरी आणि जनरल स्टोअर्स या दुकानाचे ...

----

पानटपरी फाेडून ५४ हजाराची सिगारेट लंपास

नाशिक : भद्रकाली फळबाजारात असलेल्या लक्ष्मी पानटपरी आणि जनरल स्टोअर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने ५४ हजार ५२० रुपयाची सिगारेटची पाकिटे लंपास केली आहेत. याप्रकरणी महाबला अन्नु देवाडिगा (५०, रा. नागचौक, पंचवटी) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. चोरट्याने ८ ते ९ फेब्रुवारीदरम्यान घरफोडी करून सिगारेटची पाकिटे लंपास केली आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----

रिक्षा उलटल्याने चालक ठार

नाशिक : रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. योगेश पोपट पवार (३४, रा. सावकी, ता. देवळा) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पवार हे सावकीवरून सटाण्याच्या दिशेने जात असताना त्यांची रिक्षा उलटली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

----

पारिजातनगरला युवकाची आत्महत्या

नाशिक : पारिजातनगर येथील वनविहार कॉलनीत राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. विक्रम यशवंत शिंदे (२५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

----

भाजलेल्या युवकाचा मृत्यू

नाशिक : शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत भाजलेल्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सातपूर येथील पपया नर्सरीजवळ घडली. यामध्ये भगवान तुकाराम बेंडकोळी (३५, रा. पपया नर्सरी) यांचा मृत्यू झाला आहे. शॉर्टसर्किट होऊन भगवान बेंडकोळी हे १ जानेवारी रोजी गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.