शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन महामंडळ देणार तरुणांना ‘गाईड’चे धडे

By admin | Updated: July 2, 2015 00:08 IST

पर्यटन महामंडळ देणार तरुणांना ‘गाईड’चे धडे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपली आहे. या औचित्यावर शहरात कोट्यवधी भाविकांसह विदेशी पर्यटकदेखील दाखल होणार आहे. त्यानिमित्त पर्यटकांना ‘नाशिक दर्शन’ घडावे, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) सुशिक्षित तरुणांना ‘गाईड’चे प्रशिक्षण देणार आहे.सिंहस्थ कुंभमेळा २०१५ यशस्वीपणे पार पडावा, यानिमित्त शहरात येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्वच शासकीय यंत्रणेकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. रामकुंडापासून त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तापर्यंत विविध विकासकामे युध्दपातळीवर पूर्ण केली जात आहे. कुंभमेळ्याच्या ब्रॅण्डिंगसाठी पर्यटन महामंडळानेदेखील पुढाकार घेतला असून देशभरात सुमारे साठ ठिकाणी जाहिरात फलक महामंडळ उभारणार आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर, नाशिक परिसरातील विविध धार्मिक स्थळांची माहिती व सखोल शास्त्रोक्त अभ्यास असणाऱ्या व पर्यटनाची आवड असलेल्या होतकरू आठवी ते बारावीचे शिक्षण घेतलेल्या तरुणांना ‘गाईड’चे प्रशिक्षण पर्यटन महामंडळाकडून दिले जाणार असल्याची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी दिली आहे.ऐतिहासिक, सांस्कृतिक व पर्यटन विषयक माहिती-ज्ञान अवगत करण्याची आवड तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि उत्तम संभाषण कौशल्य असणाऱ्या तरुणांसाठी स्वयंरोजगाराची संधी या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे. महामंडळाकडून मुलाखतीद्वारे ‘गाईड’ अर्थात पर्यटक मार्गदर्शक म्हणून संबंधितांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या सर्व तरुणांना गाईडचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी इच्छुकांनी गुरुवार (दि.२) महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय, नाशिककडे समक्ष अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.