काबरा विद्यालयाचा गुणगौरव सोहळा

By Admin | Updated: July 28, 2014 00:57 IST2014-07-27T23:15:49+5:302014-07-28T00:57:19+5:30

काबरा विद्यालयाचा गुणगौरव सोहळा

Graveyard Celebration of Kabra School | काबरा विद्यालयाचा गुणगौरव सोहळा

काबरा विद्यालयाचा गुणगौरव सोहळा

मालेगाव : राजस्थान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. ल. रा. काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तथा कै. पुरुषोत्तम श्यामसुंदर लखोटिया बाल मंदिराचा वार्षिक पारितोषिक गुणगौरव सोहळा अग्रसेन भवन येथे झाला. अध्यक्षस्थानी हिरालाल जाजू होते. प्रमुख पाहुणे म्हणून शंकरलाल मोदी, रविष मारू, आर. एस. मेहेर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात इ. पहिली ते दहावीतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्यांचे वाटप संस्थेच्या दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या शिष्यवृत्तींमार्फत केले गेले. गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांना गणवेश तथा वह्यांचे वाटप करण्यात आले. विद्यालयात वर्षभरात जे उपक्रम जसे राष्ट्रीय स्काऊट स्पर्धा, राज्य स्काऊट स्पर्धा, चित्रकला, विविध स्पर्धा परीक्षा यात नैपुण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. मेहेर यांनी मार्गदर्शन केले. शंकरलाल मोदी, रविष मारू यांचीही भाषणे झाली. हिरालाल जाजू यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी सातत्य, प्रयत्न व आत्मविश्वास या त्रिसूत्रीची गरज असल्याचे सांगितले.
प्रस्ताविक संस्थेचे अध्यक्ष देवकिसन बडाळे यांनी केले. अहवाल वाचन कार्यवाह भरतकुमार तापडिया यांनी केले. कार्यक्रमास बन्सीलाल लोया, भरतकुमार तापडिया, सहकार्यवाह रामरतन काबरा, कोषाध्यक्ष अशोक राणासरिया, गोविंदनारायण तोतला, माध्यमिक शाळा समिती अध्यक्ष ओमप्रकाश सारडा, कल्पेश हेडा, मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव, एम. एन. पाठक, उमा मोदी आदि उपस्थित होते. आभार शरद चित्ते यांनी मानले.(प्रतिनिधी)

Web Title: Graveyard Celebration of Kabra School