अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, नेमणुका द्या

By Admin | Updated: July 30, 2014 00:19 IST2014-07-29T22:44:29+5:302014-07-30T00:19:07+5:30

सहविचार सभा : मुख्याध्यापक संघाची मागणी

Grace Practice Principles, Give Appointments | अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, नेमणुका द्या

अनुकंपा तत्त्वावरील मान्यता, नेमणुका द्या

सिन्नर : शासनाने अनुकंपा तत्त्वावरील मान्यता व नेमणुका त्वरित द्याव्यात, अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी बी. एन. औताडे व जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या सहविचार सभेत या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले.
या सहविचार सभेत जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने अनुकंपा तत्त्वावरील मान्यता व नेमणुका त्वरित द्याव्यात, संस्थाचालकांना तसे आदेश द्यावे व अनुकंपाच्या जागा त्वरित भरण्याची मागणी करण्यात आली. यासह वर्ष संपताच एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात कर्मचाऱ्यांना पी.एफ.च्या पावत्या अदा कराव्यात, डी.एड. ते बी.एड. स्केलच्या मान्यता संस्था देत नसेल तर शिक्षणाधिकारी पातळीवर देण्यात याव्या, सन २०१२ नंतरची राहिलेली मेडिकल बिले त्वरित काढावीत, तसेच नोव्हेंबर २००५ नंतर मान्यता मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे पी.एफ. खाते त्वरित सुरू करावे, शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर नियमित वेतनश्रेणी विनाअट लागू करावी, कर्मचाऱ्यांना विनाअट निवडश्रेणी द्यावी, कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणाच्या सूचना भविष्यनिर्वाह निधी व वेतन पथकाला द्याव्यात आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या सहविचार सभेस मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एस. बी. शिरसाठ, कार्यवाह एस. बी. देशमुख, सौ. ए. एस. टोणपे, के. के. अहिरे, आर. डी. निकम, के. एम. मोरे, एस. डी. शेलार, एस. के. सावंत, माणिक मढवई, एस. एन. बच्छाव, एस. ए. पाटील, के. डी. देवरे, बी. के. शेवाळे, बी. डी. गांगुर्डे, आर. टी. जाधव, योगेश पाटील, किशोर पालखेडकर, इरफान शेख आदिंसह मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Grace Practice Principles, Give Appointments