शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या निधीवर शासनाचा डोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2020 00:49 IST

सिन्नर : ग्रामपंचायतींना मिळालेल्या तेराव्या वित्त आयोगांतर्गत अखिर्चक निधी तसेच चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीवरील व्याजाची रक्कम परत मागवुन ...

ठळक मुद्देअर्सेनिक ३० औषध खरेदी : निधीवरील व्याजाची रक्कम शासन खात्यात जमा करण्याचे आदेश

सिन्नर : ग्रामपंचायतींना मिळालेल्या तेराव्या वित्त आयोगांतर्गत अखिर्चक निधी तसेच चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीवरील व्याजाची रक्कम परत मागवुन घेत ती या निधीतून ग्रामपंचायतींना कोरोना प्रतिबंधक अर्सेनिक अल्बम-३० या गोळ्यांचा पुरवठा करण्याचा घाट राज्य शासनाने घातला आहे.वित्त आयोगाचा निधी जमा करण्याचा आदेशच ग्रामविकास विभागाच्या उपसचिवांनी दिल्याने ग्रामपंचायतींसमोर येत्या काळात कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी गावपातळीवर पैसा उपलब्ध करावयाचा कोठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे राज्यशासन कोरोनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यात अपयशी ठरल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. विशेष म्हणजे एकट्या सिन्नर तालुक्यातून १ कोटी ९७ लाख तर नाशिक जिल्ह्यातून १७ कोटींची रक्कम शासनाच्या खात्यात जमा होणार असून ही रक्कम गेल्यानंतर ग्रामपंचायतींकडे पैसाच उरणार नसल्याने येत्या काळात ग्रामपंचायतींसमोर कोरोनाचा प्रतिकार करण्याचे संकट उभे राहिले आहे.अर्सेनिक अल्बम-३० या होमियोपॅथिक कोरोना प्रतिबंधक औषधांची खरेदी एखाद्या एजन्सी मार्फत करून शासनाने ती ग्रामपंचायतींना पुरविणे किंवा स्थानिक पातळीवर ही औषधे खरेदी करण्याचा ग्रामपंचायतींना अधिकार बहाल करणे अपेक्षित असताना ग्र्रामपंचायतींकडूनच त्यासाठी लाखो रु पयांची रक्कम शासन खात्यात जमा करण्यामागे शासनाचा नेमका हेतू काय आहे याचे कोडे लोकप्र्रितनिधींसह ग्रामसेवकांनाही पडले आहे.चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधी व त्यावरील व्याजाची रक्कमेतून कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री जसे सॅनिटायझर, मास्क, सोडीयम हायपोक्लोराईड खरेदी तसेच आशा, अंगणवाडी सेविकांचा २५ लाखांचा विमा उतरविणे, अपंग निराश्रीत असलेल्यांना सहाय्य देणे, संक्र मक रोगाचा उद्रेक फैलाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे त्याचप्रमाणे आशा, अंगणवाडी सेविकांना अतिरिक्त एक हजार रु पये प्रोत्साहन भत्ता देणे आदी कामांसाठी रक्कम खर्च करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे उपसचिवांनी ३१ मार्च रोजी ग्रामपंचायतींना काढले होते. त्यातून हा खर्च करण्यात ग्रामपंचायतींना शक्य झाले मात्र पुढील काळात या निधीवरील व्याजाची रक्कम शासनाकडे वगर्र् झाल्यानंतर कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पैसा उपलब्ध करायचा कोठून असा पेच ग्रामपंचायतींसमोर आहे.

अखर्चिक निधीएका कुटूंबासाठी साधारणपणे १ बॉटल याप्रमाणे होलसेल दरात ३० रु पयास अर्सेनिक अल्बम-३० ची ८० ते १२० गोळ्यांची बॉटल बाजारात उपलब्ध होते. ५०० कुटूंबसंख्येच्या गावात साधारणपणे १५ हजार रु पये खर्चात या औषधांचे वाटप होत असताना शासनाने मात्र तेराव्या वित्त आयोगांतर्गत अखिर्चक निधी तसेच चौदाव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीवरील व्याजाची लाखो रु पयांची संपूर्ण रक्कम अर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांच्या वाटपासाठी राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान पुणे यांच्या युुनियन बँकेच्या शाखेतील खात्यात जमा करण्याचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रHealthआरोग्य