सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 01:29 IST2017-08-06T01:29:20+5:302017-08-06T01:29:25+5:30

बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही प्रवाहाप्रमाणे बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली आहे. अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी नाशिकमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये सोन्या-चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडेल अशा दरात म्हणजे अगदी सातशेपासून पाच हजार रु पयांपर्यंत सोन्याच्या डिझायनर राख्या सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

Gold and Silver Beverage Crops | सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली

सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली

नाशिक : बहीण-भावाचे नाते दृढ करणारी राखी ही प्रवाहाप्रमाणे बदलली असून, युवावर्ग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात आता सोन्या-चांदीच्या राख्यांची क्रे झ वाढली आहे. अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राख्यांची ही गरज पूर्ण करण्यासाठी नाशिकमधील सर्व सराफी पेढ्यांमध्ये सोन्या-चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध आहेत. खिशाला परवडेल अशा दरात म्हणजे अगदी सातशेपासून पाच हजार रु पयांपर्यंत सोन्याच्या डिझायनर राख्या सराफ व्यावसायिकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
सध्या सोन्याच्या राख्यांना जास्त मागणी आहे. यात स्टोन राखी, एम्बास, अँटीक वर्क, कुंदन वर्क, पोलकी वर्क अशा विविध प्रकारच्या राख्यांना पसंती दिली जात आहे. तरु णवर्गाच्या मागणीप्रमाणे कमी वजनाच्या आणि दिसायला आकर्षक व सुबक राख्यांना प्रचंड मागणी असल्याचे सुवर्ण व्यावसायिक सांगतात. सोन्याची राखी दिसायला तर आकर्षक असतेच, शिवाय ती वर्षानुवर्षे तशीच जपून ठेवली जात असल्यामुळे अशा राख्या घेण्याकडे तरुणाईचा कल वाढला आहे. सोन्याचे भाव चढेच असल्यामुळे राखीसाठी मोजलेले पैसे म्हणजे एकप्रकारची गुंतवणूकच असते. यातून सणही साजरा होतो व सोने खरेदीचा आनंदही मिळतो. सोन्याच्या राख्यांमध्ये चारशे ते साडेचारशे प्रकार आहेत. चांदीच्या राख्यांनाही चांगली मागणी आहे. मध्यमवर्ग आणि सर्वसामान्य लोकांकडून पूर्वीपासूनच चांदीच्या राखीला पसंती दिली जाते. यंदाही चांदीच्या राख्यांचे शेकडो प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. यात ब्रेसलेट, जडाऊ कलाकुसरीच्या राख्या, राखी कम ब्रेसलेट, मोत्याच्या राख्या असे विविध प्रकार आहेत. या राख्या दोनशेपासून वीस हजार रुपयांपर्यंत मिळत आहेत.

Web Title: Gold and Silver Beverage Crops