शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

लासलगाव रेल्वेस्थानकाला महाप्रबंधकांची भेट

By admin | Updated: January 19, 2017 00:42 IST

लासलगाव रेल्वेस्थानकाला महाप्रबंधकांची भेट

लासलगाव : येथील रेल्वेस्थानकाच्या निरीक्षणासाठी महाप्रबंधक डी. के. शर्मा यांनी भेट देत परिसराची तसेच रेल्वेस्थानकाजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी लासलगाव येथील प्रवासी संघटना, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, समर्थ प्रतिष्ठान यांच्यातर्फे लासलगाव येथे कामायनी, नंदीग्राम, अमृतसर-दादर एक्स्प्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, असे निवेदन देण्यात आले. मालधक्क्यावर फक्त लोडिंग होते तेथे अनलोडिंग सुविधा सुरू करावी, लासलगाव मालधक्क्यावरून लोडिंग होणारा माल दक्षिणेकडे टू पॉइंट अनलोडिंग सुविधा सुरू करावी, रेल्वेस्थानक परिसर व बुकिंग आॅफिसजवळ सीसीटीव्ही  कॅमेरे बसविण्यात यावे आदि  मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.  खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नवीन गाड्यांच्या थांब्याबाबत रेल्वेमंत्र्यांशी आपली दिल्लीत चर्चा झालेली आहे. गाड्यांना थांबे आणि प्रवाशांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा आग्रह खासदार चव्हाण यांनी महाप्रबंधक डी. के. शर्मा यांना केला.  शर्मा यांनी या कामासाठी खासदार निधीतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे उलट सुचविले. यावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी शौचालयासाठी निधी देण्याची तयारी दर्शविली.  याप्रसंगी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपाध्यक्ष प्रदीप गांगुर्डे, शैलेश साबद्रा, डॉ. युवराज पाटील, सिद्धार्थ दाभाडे,  तुषार गोरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश दायमा, शंतनू पाटील, नीलेश सालकाडे, योगेश पाटील, गिरीश साबद्रा, विशाल पालवे, पंचायत समिती सदस्य प्रकाश पाटील, सूरज नाईक, दत्ता पाटील,  समर्थ प्रतिष्ठानचे संदीप उगले, प्रमोद पाटील, मयूर वाकचौरे,  राजेंद्र कराड, मयूर झांबरे,उमेश लचके, महेंद्र हांडगे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)