पुरुषोत्तम विद्यालयात गुणगौरव सोहळा

By Admin | Updated: July 28, 2014 00:51 IST2014-07-28T00:29:04+5:302014-07-28T00:51:18+5:30

पुरुषोत्तम विद्यालयात गुणगौरव सोहळा

Gaurav Saurav from Purushottam Vidyalaya | पुरुषोत्तम विद्यालयात गुणगौरव सोहळा

पुरुषोत्तम विद्यालयात गुणगौरव सोहळा

नाशिकरोड : यश मिळणे अवघड नाही; परंतु बघितलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन के. के. वाघ इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी केले.
पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरवप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. नांदूरकर यांनी इ. दहावी व बारावीनंतर विद्यार्थ्यांनी कोणते क्षेत्र निवडावे याविषयी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष वसंतराव जोशी होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य उदय शेवतेकर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नामदेव आढाव, नीळकंठ नांदूरकर, सुहास खरोटे, सुरेश दीक्षित, अनिल पवार डॉ. शुभांगी कुलकर्णी, राजेंद्र शेळके, भरत भालेराव, भाऊलाल पवार उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य उदय शेवतेकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सुरेश गायधनी यांनी करून दिला. सूत्रसंचालन संध्या अहेर, सुभाष पवार यांनी केले. पारितोषिकाचे वाचन सुरेखा म्हसकर व प्रदीप वाघ यांनी केले. संध्या अहेर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Gaurav Saurav from Purushottam Vidyalaya