शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण @ 38 टक्के

By admin | Updated: July 11, 2016 00:52 IST

धरण क्षेत्रात २५२ मिमी पाऊस : बारा तासांत १४ टक्क्यांनी वाढ; संततधार सुरूच असल्याने पातळीत वाढ शक्य

नाशिक : गेल्या २४ तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाचा जलसाठा अठरा टक्क्यांनी वाढला आहे. १९ टक्क्यांवर असलेल्या धरणाची पातळी थेट ३७.४ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. रविवारी (दि.१०) धरण क्षेत्रात बारा तासांत २५२ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एकूणच धरणाचा वाढलेला जलसाठा ही बातमी नाशिककरांना दिलासा देणारी आहे.रविवारी पावसाने सायंकाळपर्यंत जोरदार हजेरी लावल्याने सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १३३ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने केली आहे. दिवसभरात विक्रमी पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. धरण क्षेत्रात रविवारी बारा तासांमध्ये सुमारे २५२ मिलिमीटर पाऊस झाला असून, गंगापूर धरणाचा जलसाठा दोन हजार १२५ दशलक्ष घनफूट इतका वाढला आहे. मागील आठवड्यात गंगापूर धरणात १९ टक्के जलसाठा होता. रविवारच्या पावसाने धरणाच्या पाण्याच्या पातळीत अठरा टक्के वाढ होऊन ३७ टक्के धरण भरले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजेपासून तर रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत गंगापूर धरणात २३ टक्के जलसाठा होता; मात्र सकाळपासून सायंकाळपर्यंत धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे बारा तासांत १४ टक्क्यांनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. येत्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दारणा धरणाच्या जलसाठ्यातही वाढ झाली असून, चार हजार ११९ दशलक्ष घनफूट इतका जलसाठा असून ५२.६२ टक्के दारणा धरण भरले आहे.