शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

इदगाह मैदानावर गणेशमूर्तींचे गाळे

By admin | Updated: August 25, 2016 00:36 IST

विक्रेत्यांची सहमती : मनपाची गाळे उभारण्यास परवानगी

नाशिक : गेल्या काही वर्षांपासून त्र्यंबक रस्त्यावरील जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर गणेशमूर्ती विक्रीसाठी थाटण्यात येणारे गाळे यंदा इदगाह मैदानावर उभारण्यात येणार असून, मूर्ती विक्रेत्यांनीही त्यास संमती दर्शविली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गाळे उभारणीबाबतचा वाद संपुष्टात आला आहे. येत्या ५ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गणेशमूर्ती विक्रीसाठी दाखल होत आहेत. नाशिक-पुणे रोडलगत पौर्णिमा स्टॉपजवळ तसेच गांधीनगर या भागात खासगी जागेत गाळे उभे राहत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा रुग्णालयालगत आणि हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानालगतच्या जागेत मूर्ती विक्रीसाठी गाळे उभारण्यात येत आहेत. जिल्हा रुग्णालय परिसर हा शांतता क्षेत्र घोषित केलेला असल्याने आणि परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिका व पोलीस प्रशासनाकडून गाळे उभारणीसाठी परवानगी नाकारण्यात येत होती. तरीही परवानगी नसताना गाळेधारकांकडून गाळे उभारले जात होते. दोन वर्षांपूर्वी गाळे उभारणीवरून वाद उद्भवला होता. अखेर महापालिका व पोलीस प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. मागील वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे जिल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारण्यास मनाई करण्यात आली होती. पर्वणीकाळातच गणेशोत्सव आल्याने आणि शहरात लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मूर्ती विक्रेत्यांनी सहकार्याची भूमिका घेत खासगी जागांचा शोध घेऊन तेथे गाळे उभारले होते. यंदाही महापालिकेने जिल्हा रुग्णालयाबाहेर गाळे उभारण्यास मनाई करतानाच जवळच असलेल्या इदगाह मैदानासह शहरात सुमारे २५० ठिकाणी गाळे उभारणीसंदर्भातील प्रस्ताव पोलीस प्रशासनाला सादर केलेला आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाने गाळे विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर विक्रेत्यांनी यंदा इदगाह मैदानावर गाळे उभारण्यास सहमती दर्शविल्याने गेल्या काही वर्षांपासूनच्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. (प्रतिनिधी)