मित्रानेच केला मित्राचा खून

By Admin | Updated: October 20, 2016 02:34 IST2016-10-20T02:32:43+5:302016-10-20T02:34:09+5:30

जलालपूर शिवारातील घटना : सहा संशयित पोलिसांच्या ताब्यात

Friend murdered by friend | मित्रानेच केला मित्राचा खून

मित्रानेच केला मित्राचा खून

नाशिक : जलालपूर शिवारातील आळंदीसंगमाजवळ मद्याच्या नशेत मित्रांनीच एका मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार बुधवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास उघडकीस आला़ खून झालेल्या तरुणाचे नाव आकाश बाळू सूर्यवंशी (२५ रा. राहुलनगऱ सध्या राहणार जत्रा हॉटेलमागे अमृतधाम) असे आहे़ खून झालेल्या युवकाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे तसेच पैशांच्या देवाण-घेवाणीतून हा प्रकार घडला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे़ दरम्यान, याप्रकरणी पाच ते सहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश सूर्यवंशी यास मंगळवारी (दि़१८) रात्रीच्या सुमारास जलालपूर शिवारातील आळंदीसंगम धबधब्यावर त्याचे अज्ञात मित्र घेऊन आले़ या ठिकाणी असलेल्या उंच टेकडीवर त्याच्यावर धारदार हत्याराने वार केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याचा मृतदेह सीमेंटच्या गोणीत टाकून नदीकिनारी टाकून दिला़ आकाशच्या अंगावर सुमारे पंधरा वार असून अतिरक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला आहे़
बुधवारी (दि़ १९) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पोलीस पाटील मोहिते यांनी नदीकिनारी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती गंगापूर पोलिसांना दिली़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनाम्यानंतर आकाशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवून दिला़

Web Title: Friend murdered by friend