शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मोसम, आराम नद्यांवर बंधाऱ्यांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 11, 2017 00:19 IST

द्याने : बागलाण तालुक्यातील मोसम, आरम, कान्हेरी व हत्ती या नद्यांवर बंधारे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

द्याने : बागलाण तालुक्यातील मोसम, आरम, कान्हेरी व हत्ती या नद्यांवर बंधारे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. जलसंपदा विभागाचे उपसचिव एस.ए. टाटू यांनी मुख्य अभियंता जलसंपदा विभाग उत्तर महाराष्ट्र प्रदेश (नाशिक) यांना आदेश दिले. यामुळे नद्यांवर पाच दशलक्ष घनफूट क्षमतेपर्यंतचे बंधारे बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या मागणीला पालकमंत्री गिरीश महजन यांच्या मंजुरीसाठी कृउबा संचालक डॉ. दिकपाल गिरासे यांनी पाठपुरावा केला. नद्यांवर ज्या भागात खडक असेल तेथे तांत्रिकदृष्ट्या पाया बांधून पाणी अडविणे शक्य आहे. याठिकाणी बंधारे बांधता येणार आहेत. धरणाच्या नियोजित सिंचनावर परिणाम न होता पावसाळ्यातील पूरपाणी बंधाऱ्यांमध्ये अडविता येणार आहे. याचा फायदा त्या क्षेत्रातील शेतजमीनींना होणार आहे. यामुळे पाण्याची पातळी वाढून हजारो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याचबरोबर अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे.मोसम नदीवरील ब्राह्मणपाडे, वाघळे, मोराने व अंबासन येथील ब्रिटीशकालीन बंधाऱ्यांची अवस्था प्रत्यक्ष दाखविल्यानंतर गिरीश महाजन यांनी हे सर्व विषय मार्गी लावण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. यासाठीचे शिफारसपत्र डॉ. सुभाष भामरे यांनी सादर केल्यावर त्या कामांची देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आहे. भाजपा सरकारने या भागातील सिंचन व पाणीप्रश्न सोडविण्यास किटबद्ध आहे. असे आश्वासन जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी पर्यटन मंत्री व निवडणूक प्रभारी जयकुमार रावल यांनी जनतेला सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढू असा शब्द दिला होता. त्याचीच हि पूर्तता आहे. (वार्ताहर)