नाशिक : गेल्या पावणे दोन वर्षांपासून प्रशासक मंडळ असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून मतदार याद्यांचे ठराव २१ जानेवारीपासून मागविण्यात आले आहेत. दरम्यान, सद्यस्थितीत विविध कार्यकारी संस्थाच्या निवडणुका सुरू असल्याने आधीच्या संचालक मंडळाकडून ठराव आल्यास आता नवनियुक्त संचालक मंडळाकडूनही दुसरे ठराव येण्याची शक्यता असल्याने याबाबत विविध सहकारी संस्थांचे काही प्रतिनिधी या निवडणुकीविरोधात न्यायालयात धाव घेण्याची शक्यता असल्याने जिल्हा बॅँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवर स्थगितीची टांगती तलवारही कायम असल्याचे चित्र आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}