शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

वायगाव येथे चार टन डाळिंबाची चोरी

By admin | Updated: February 21, 2017 01:44 IST

लाखोंचे नुकसान : शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण

द्याने : बागलाण तालुक्यातील वायगाव येथील डाळींब उत्पादक शेतकरी सोपान लोटन सूर्यवंशी यांच्या गट नंबर ७३/२ शेतातील विक्र ीस आलेल्या चार टन डाळिंबाची चोरट्यांनी मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन चोरी केल्याने अंदाजे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा शेतीपिकासह ठिबक संच, विद्युत मोटारी, फवारणी यंत्र आदि शेतोपयोगी औजारांकडे वळवला असल्याने शेतकऱ्यांत घबराट पसरली आहे. सूर्यवंशी यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळेही जोपासताना त्यांनी डाळींबबागेवर केलेल्या औषध, रासायनिक खते, सेंद्रिय खते व त्यासाठी सर्व मेहनत छाटणीपासून ते डाळिंबाच्या झाडांना आधार देण्यापर्यंत केलेला सर्व खर्च कर्ज काढून केला होता. दुष्काळजन्य परिस्थितीत त्यांनी टॅँकरमार्फत पाणी विकत घेऊन बाग जोपासली होती. बागेतील डाळींब परिपक्व झाले असून ते विकण्यासाठी व्यापाऱ्यांच्या संपर्कात होते. व्यापाऱ्यांनीही बागेची पाहणी केली. एक ते दोन दिवसात या संपूर्ण डाळींबाची विक्र ी होणार होती. या बागेतून सुमारे चार टन माल निघेल, असा अंदाज व्यापाऱ्यांनीही व्यक्त केला होता. आजचा दर प्रतिकिलो १०० ते ११० रूपयेपर्यंत आहे. १०० रुपये सरासरी मिळेल व आपणास चार ते पाच लाख रूपये मिळतील अशी अपेक्षा होती. परंतु चोरट्यांनी एका रात्रीत पाचशेच्या वर डाळिंब तोडून नेले.  ही बाब सूर्यवंशी यांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांत रितसर चोरीची तक्र ार दाखल केली आहे. जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीराम कोळी, हवालदार मोरे अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)हातातोंडाशी आलेला घास गेलानामपूर-वायगाव रस्त्यालगत सोपान सूर्यवंशी यांची शेती असून, या शेतात त्यांनी डाळिंबाची बाग जोपासली आहे. तेल्या व मर रोगाशी दोन हात करत डाळिंबाची बाग वाचविण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करून व फवारणीसाठी हातउसनवार घेतलेले पैसे यांचा ताळमेळ बसवत मोठ्या हिमतीने डाळींबबाग पिकवली होती. बहार आलेले डाळींब विकून हातउसनवार घेतलेले पैसे याची परतफेड करता येईल अशी अशा ते बाळगून होते. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास डाळींब चोरून नेल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने उचललेले कर्ज फेडावे तरी कसे असा प्रश्न सूर्यवंशी यांच्यापुढे उभा आहे.