सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगच्या चौघा संशयिताना ताब्यात

By Admin | Updated: December 30, 2014 01:38 IST2014-12-30T01:36:52+5:302014-12-30T01:38:23+5:30

सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगच्या चौघा संशयिताना ताब्यात

The four suspects of the notorious Tiger of CIDCO were arrested | सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगच्या चौघा संशयिताना ताब्यात

सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगच्या चौघा संशयिताना ताब्यात

सिडको : मागील भांडणाची कुरापत काढून एका घरासमोरील दुचाकी जाळण्याबरोबरच एका घराच्या दरवाजावर पेट्रोलचे बोळे फेकून घर जाळण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे सिडको परिसरात घडला़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी सिडकोतील कुविख्यात टिप्पर गँगच्या चौघा संशयिताना ताब्यात घेतले आहे़ या घटनेमुळे सिडको परिसरात टिप्परची दहशत कायम असून, त्यांनी एकप्रकारे हे पोलिसांना आव्हानच दिले आहे़ सिडको परिसरात टिप्पर गँग पुन्हा सक्रिय झाली असून, परिसरातील दहशत कायम ठेवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे या घटनेवरून दिसून येते़ सिडकोतील एक कोटी लुटीच्या प्रकरणानंतर प्रामुख्याने प्रकाशझोतात आलेल्या टिप्पर गँगचे म्होरके तसेच सक्रिय सदस्यांवर पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केली आहे़ याबरोबरच खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याच्या संशयामुळे ते कारागृहात आहेत़ मात्र यातील एकाची जामिनावर मुक्तता झाल्याने टिप्परने पुन्हा डोके वर काढल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून कळते़ दत्त चौकाजवळील बजरंग चौक भागात टिप्पर गँग व दुसऱ्या व्यक्तीबरोबर रविवारी रात्री काहीतरी कारणाने वाद झाला़ यानंतर टिप्पर गँगच्या बाहेर असलेल्या काही सक्रिय सदस्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास दत्त चौकातील सप्तशृंगी परिसरात घरासमोर असलेली गौरी कोष्टी यांची कायनेटीक दुचाकी (एमएच १५, ईसी ९०६४) पेट्रोल टाकून जाळली़ एवढ्यावरच समाधान न मानता त्यांनी दत्त चौकातील मुख्य रस्त्यालगत राहणाऱ्या महेश सिरसाठ यांच्या बंद घराच्या दरवाजावर पेट्रोलचे पेटते बोळे फेकून घर जाळण्याचा प्रयत्न केला़ मात्र घरातील व्यक्तींना जाग आल्याने त्यांनी हे बोळे विझवल्याची माहिती नागरिकांनी दिली़ दरम्यान, सोमवारी पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास दुचाकी जाळून व घरावर पेटते बोळे फेकून एका खोलीत लपलेल्या टिप्पर गँगच्या निखिल पगारे, सचिन शिंदे, रितेश देवरे, पवन बच्छाव या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़

Web Title: The four suspects of the notorious Tiger of CIDCO were arrested