माजी सैनिकाच्या पिस्तुलाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 00:15 IST2017-08-07T00:14:57+5:302017-08-07T00:15:12+5:30

मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तूल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़

Former soldier's pistol stolen | माजी सैनिकाच्या पिस्तुलाची चोरी

माजी सैनिकाच्या पिस्तुलाची चोरी

नाशिक : मद्याच्या नशेत नाशिकरोडच्या बसस्टॅण्डवर झोपलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिकाच्या बॅगमधील पिस्तूल, जिवंत काडतुसे व कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़४) रात्रीच्या सुमारास घडली आहे़
राजेंद्र सोपान मंडलिक (४२, रा़ उंचखडक बु़ ता़ अकोले) यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ते मद्याच्या नशेत नाशिकरोड बसस्थानकावर आले होते़ त्यांनी आपली टुरिस्टर बॅग उशाला घेतली व झोपी गेले़ या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील चॉकलेटी रंगाचे ०़३२ चे पिस्तूल, सात जिवंत काडतुसे, दोन मॅगझिन, मिलिटरी डिस्चार्ज बुक, पीपीओ आधार कार्ड, इसीसीएचएस कार्ड, माजी सैनिक ओळखपत्र, सेंट्रल बँकेचे एटीएम कार्ड, कागदपत्रे असा २० हजार ३५० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ याप्रकरणी राजेंद्र मंडलिक यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Web Title: Former soldier's pistol stolen