ग्रामीण भागात मास्क-सॅनिटायझरचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 06:48 PM2021-03-04T18:48:00+5:302021-03-04T18:48:00+5:30

मानोरी : कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागात मात्र नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.

Forget the mask-sanitizer in rural areas | ग्रामीण भागात मास्क-सॅनिटायझरचा विसर

ग्रामीण भागात मास्क-सॅनिटायझरचा विसर

Next
ठळक मुद्देनागरिक मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करत नाही.

मानोरी : कोरोना व्हायरसचा प्रकोप पुन्हा एकदा वाढू लागला असताना ग्रामीण भागात मात्र नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझरचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाने निर्बंध घालून देखील नागरिक मास्क आणि सॅनिटायझर चा वापर करत नाही. ग्रामीण भागात आठवडी बाजारात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळत आहे. बाजारात गर्दी असूनही नागरिक सर्रासपणे विनामास्कचे फिरत असताना आढळून येत आहे.
सोशल डिस्टसिंगचा देखील सर्वत्र बोजवारा उडाला असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत असून प्रशासनाने ग्रामीण भागात देखील गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क वापरण्याचे बंधनकारक करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Forget the mask-sanitizer in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.