शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Top Marathi News LIVE Updates: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

नागरी वाहतूक धोरणात खासगी वाहनांना प्रतिबंध करण्यावर फोकस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 14:07 IST

नाशिक महापालिकेत सादरीकरण : आयटीडीपीकडून सादरीकरण, शाश्वत वाहतुकीवर भर

ठळक मुद्देभविष्यात वाहनकेंद्रित धोरण राबविण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागणारदहा लाखांवरील लोकसंख्या असलेल्या महापालिकांना व त्यांच्या सभोवताली २० कि.मी. परिसरासाठी सदर धोरण लागू

नाशिक : शाश्वत वाहतुकीचा हिस्सा वाढविणे आणि खासगी वाहनांचा वापर कमी करत शहराची रचना सार्वजनिक वाहतुकीस अनुकूल करण्याची सूचना महाराष्ट शासनाने प्रसिद्ध केलेल्या नागरी वाहतूक धोरणाच्या मसुद्यात करण्यात आलेली आहे. या धोरणातील ठळक मुद्द्यांचे सादरीकरण शासनाने नियुक्त केलेल्या आयटीडीपी या संस्थेने शुक्रवारी (दि.२) महापालिका आयुक्तांच्या सभागृहात झालेल्या चर्चासत्रात केले.आयटीडीपी संस्थेचे हर्षद अभ्यंकर आणि प्रांजली देशपांडे यांनी शाश्वत वाहतुकीसाठी धोरणात सुचविलेल्या विविध मुद्द्यांचा ऊहापोह केला. भविष्यात वाहनकेंद्रित धोरण राबविण्याऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करावी लागणार आहे. त्यासाठी उत्तम पदपथ, पादचारी पूल, सुरक्षित क्रॉसिंग, सायकल मार्ग, उत्तम बस, डेपो, स्थानके यासह बीआरटी व्यवस्था उपलब्ध करावी लागणार आहे. दहा लाखांवरील लोकसंख्या असलेल्या महापालिकांना व त्यांच्या सभोवताली २० कि.मी. परिसरासाठी सदर धोरण लागू असणार आहे. त्यात प्रामुख्याने, शाश्वत वाहतुकीचा हिस्सा वाढविणे, खासगी वाहनांचा वापर कमी करणे, ८० टक्के लोकवस्ती सार्वजनिक वाहतुकीपासून ५०० मीटरच्या टप्प्यात आणणे, अंध-अपंगांना नजरेसमोर ठेवत सुविधांचा रचना करणे, प्रदूषण कमी करणे, आर्थिक तरतुदींचा रोख बदलणे, विकास आराखड्यात सुधारणा करणे, पार्किंग पुरवण्यावर मर्यादा, प्रशासकीय सुधारणा करणे, अधिका-यांची तांत्रिक क्षमता वाढवणे, वाहतुकीचा सांख्यिकी आढावा घेणे, शाश्वत वाहतूक नियोजन विषयक अभ्यासक्रम ठरवणे आदी उपायोजना कराव्या लागणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी, महापौर रंजना भानसी, आयुक्त अभिषेक कृष्ण, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेता दिनकर पाटील, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, राज्याच्या ट्रॅफिक सेलच्या संचालक सुलेखा वैजापूरकर, अतिरिक्त आयुक्त रमेश पवार, उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर, शहर अभियंता उत्तम पवार, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, एसटी महामंडळाच्या यामिनी जोशी, राजेंद्र जगताप, शहर वाहतूक शाखेचे श्रीनिवास चित्राव, उल्हास भोये, सहायक नगररचना संचालक आकाश बागुल आदी उपस्थित होते.माजी उपमहापौरांचा आक्षेपसादरीकरण सुरू होण्यापूर्वीच माजी उपमहापौर व नगरसेवक गुरुमित बग्गा यांनी सदर धोरणाबाबत जनतेकडून सूचना व हरकती मागविल्या होत्या काय, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र, याबाबत सुलेखा वैजापूरकर यांच्यासह आयटीडीपीचे प्रतिनिधी उत्तर देऊ शकले नाही. सदर धोरणाबाबत आधी जनतेची मते नोंदविणे गरजेचे असून, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून महासभेत जनतेची मते मांडणारच असल्याचे बग्गा यांनी सांगितले. यावेळी महापौरांनीही या धोरणाची प्रसिद्धी अपेक्षित होती, असे सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाTrafficवाहतूक कोंडी