शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालक लूट प्रकरणातील पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 18:21 IST

सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सिन्नर : सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड येथे रात्रीच्या सुमारास एका परप्रांतीय ट्रकचा साकूर फाट्यापासून पाठलाग करून चोरट्यांनी मोटारसायकल आडव्या लावून घोरवड बसस्टॅण्डजवळ अडविले होते. शस्रांचा धाक दाखवून लुटण्याच्या प्रयत्नात असताना हा प्रकार जवळच असलेल्या स्थानिक नागरिकांच्या लक्षात आला. त्यांनी सतर्कहोत चोरट्यांना पकडले. संदीप देवराम कोकाटे (२०) व ज्ञानेश्वर काळू जळंदे हे नागरिकांच्या हाती लागले, मात्र अमर वसंत दिवटे (१९), किरण वसंत दिवटे (२०), नीलेश गंगाराम गिळंदे (१९), सुभाष गोटीराम दिवटे (१९), रोहित गोरख गिळंदे (१९) आदी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते. पोलिसांनी तपास करून या पाच जणांना त्यांच्या राहत्या घरून ताब्यात घेण्यात आले. या टोळीकडून महामार्गावरील आणखी लूट व चोरी प्रकरणांचा तपास लागण्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी, पोलीस हवालदार पवार पुढील तपास करीत आहे.

टॅग्स :NashikनाशिकArrestअटक