शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 01:18 IST

कोरोनाच्या महामारीतून हळूहळू बाहेर येत असतानाच आता म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सिडको परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर हा आजार होत असल्याचे सांगितले जात असून, या रुग्णाच्या बाबतीतही सर्वच प्रकार त्याच प्रकारचे घडले आहे. एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रशासन यासाठी काय खबरदारी घेणार याकडे सिडकोवासीयांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकोरोनामुक्तीनंतरही  संकट : उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष

सिडको : कोरोनाच्या महामारीतून हळूहळू बाहेर येत असतानाच आता म्युकरमायकोसिसचा पहिला रुग्ण सिडको परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कोरोनातून मुक्त झाल्यानंतर हा आजार होत असल्याचे सांगितले जात असून, या रुग्णाच्या बाबतीतही सर्वच प्रकार त्याच प्रकारचे घडले आहे. एका खासगी रुग्णालयात या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आता प्रशासन यासाठी काय खबरदारी घेणार याकडे सिडकोवासीयांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक व परिसरात संसर्ग वाढत असताना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारानेही धास्ती निर्माण केली आहे. नाक, घसा तज्ज्ञाकडे रोज चार-पाच रुगण उपचारासाठी येत आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची आरोग्य यंत्रणेने गंभीर दखल घेतली असून, शहरात या रुग्णांचे ट्रेसिंग करण्याच्या सूचना  देण्यात आल्या आहेत. या  म्युकरमायकोसिस  या बुरशीजन्य आजाराने डोळ्यासारखा महत्त्वाचा अवयवही निकामी होत आहे. जुने सिडको भागातील युवकाला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. यात एचआरसीटी स्कोर वाढला होता.  शहरातील खासगी रुग्णालयातून उपचार झाल्यानंतर पंधरा दिवसांनंतर त्याने कोरोनावर मात केली. मात्र काही दिवसातच या रुग्णाच्या एका डोळ्याची संवेदना नष्ट झाली. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले व शस्त्रक्रिया करून  निकामी झालेला डोळा काढून टाकण्यात आला. त्यानंतरही त्रास झाल्याने शहरातील तिसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, काही  दात काढणार असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. सिडकोसारख्या भागात  म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा रुग्ण आढळल्याने नागरिकांनी  धास्ती घेतली आहे.रुग्णालयात उपचार सुरुया रुग्णाने कोरोनावर मात केली असली तरी त्याचा एक डोळा या आजारामुळे काढून टाकावा लागला आहे आणि अजूनही संबंधित रुग्णावर शहरातील एका रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सिडको हा दाट वस्तीचा भाग असल्याने या ठिकाणी अशा संसर्गाचा प्रसार ताबडतोब होऊ शकतो त्यामुळे आता नागरिकांनी याची खबरदारी घेऊन स्वतःबरोबरच इतरांचेही रक्षण करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. सिडकोतील शिवाजी चौक परिसरात अशा प्रकारचा रुग्ण आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यMucormycosisम्युकोरमायकोसिस