गोळे कॉलनीतील राठी कॉम्प्लेक्सला आग

By Admin | Updated: April 10, 2017 22:29 IST2017-04-10T22:29:16+5:302017-04-10T22:29:16+5:30

गोळे कॉलनीतील राठी कॉम्प्लेक्समधील सोनल इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडच्या बंद कार्यालयास सोमवारी (दि़१०) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली़

Fire at Rathi Complex in Goole Colony | गोळे कॉलनीतील राठी कॉम्प्लेक्सला आग

गोळे कॉलनीतील राठी कॉम्प्लेक्सला आग


नाशिक : गोळे कॉलनीतील राठी कॉम्प्लेक्समधील सोनल इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेडच्या बंद कार्यालयास सोमवारी (दि़१०) सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली़ या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली असली तरी कार्यालयातील सर्व वस्तू जळाल्या असून, त्यामध्ये लाखोंची नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जातो आहे़
गोळे कॉलनीतील राठी कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील एका कार्यालयाच्या खिडकीतून धुराचे लोट दिसल्याने मेडिकल व्यावसायिकांनी कॉम्प्लेक्समधील नागरिकांना सावध केले़ यापैकी काही नागरिकांनी अग्निशमन दलास फोन केल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत शिंगाडा तलाव व पंचवटी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले़ त्यांनी अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले़ .

Web Title: Fire at Rathi Complex in Goole Colony