शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

.‘मूडस् आॅफ मुकेश’ला रसिकांची भरभरून दाद

By admin | Updated: January 16, 2015 00:05 IST

हार्मनी आर्टची रसिकांना नववर्षाची संगीत भेट

नाशिक : भावनाप्रधान गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वर्गीय मुकेश यांची एकल आणि द्वंद्व गीते सादर करीत येथील ‘हार्मनी आर्ट’ गॅलरीतर्फे ‘मूडस् आॅफ मुकेश’ हा संगीत कार्यक्रम सादर करीत नाशिकच्या रसिकांना नववर्षाची अनोखी भेट दिली.या नववर्षाच्या सदर संगीत समारंभात गिटारीस्ट जयंत पाटेकर यांनी ‘गायेजा गीत मिलनकी’ या गीताने सुरुवात केली. त्यानंतर ‘कई सदीयो से कई जन्मोसे’, ‘मेरे टुटे हुवे दिलसे’, ‘चांदको क्या मालूम’, ‘सजन रे झुट मत बोलो’ अशी सर्वांच्या ओठी रेंगाळत असलेली गीते सादर केली. उषा पाटेकर यांनी जयंत पाटेकर यांच्या समवेत ‘जीस दिलमे बसाता प्यार तेरा’, ‘किसी राहमे किसी मोड पर’, ‘मुझको इस रातकी तनहायी मे आवाज न दो’, ‘ओ मेरे सनम ओ मेरे सनम’, ‘इक प्यार का नगमा है’ अशी गीत गायली. कार्यक्रमाचे निवेदक उस्मान पटणी यांनी ‘किसी की मुस्कराहटो पे हो नीसार’, ‘जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे’, ‘तेरी निगाहो पे मरमर गये हम’ आदी सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळविली. विद्या कुलकर्णी व सिंथेसायझर वादक किशोर पाटेकर यांनी ‘जाने कहा गये वो दिन’, ‘किसी राहमे किसी मोड पर’ही गीते तर प्रेक्षकांमधुन डॉ. शरद म्हसकर यांनी ‘जाने कहा गये वो दिन’ हे गीत तर सुधीर कुलकर्णी यांनी ‘दुनिया बनाने वाले क्या तेरे मनमे समाई’ आणि ‘ओहोरे ताल मिले नदीके जलमे’ ही अतिशय उडत्या चालिची गीते सादर केली. त्यांना राजन अग्रवाल (ढोल, ढोलकी, कोंगो), अजय गायकवाड (अ‍ॅक्टोपॅड) यांनी साथ संगत केली. प्रारंभी सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब सोनवणे, मधुकर झेंडे, संगीतकार धनंजय धुमाळ, अ‍ॅड. साहेबराव पवार, डॉ. सरोज म्हसकर, अ‍ॅड. रंजना वावरे आदिंच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नववर्षाची सुरुवात म्हणून आलेल्या प्रेक्षकांना गुलाबपुष्प व चहा देण्यात आला. राजा पाटेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)