शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त व्यापाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: April 30, 2017 01:30 IST

मनमाड : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, यामुळे व्यवसाय करणे अडचणीचे झाल्याने व्यापारी वर्गाने वीज कार्यालया-समोर ठिय्या देत धरणे आंदोलन केले.

 मनमाड : वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अघोषित भारनियमन, झीरो लोडशेडिंग यामुळे व्यवसाय करणे अडचणीचे झाल्याने शहरातील संतप्त व्यापारी वर्गाने वीज वितरणच्या विभागीय कार्यालया-समोर ठिय्या देत धरणे आंदोलन केले.गेल्या काही दिवसांपासून मनमाड शहरात वीज पुरवठ्याच्या वाढत्या गोंधळाने नागरीक हैराण झाले आहे. एकीकडे उन्हाळ्यामुळे उष्णतेच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली असताना त्यात भारनियमनाची भर पडली आहे.कुठलीही पुर्वसुचना न देता वेळी अवेळी विज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सहा ते सात तास विज पुरवठा बंद रहात असल्याने व्यापारी वर्गाला व्यवसाय करणे अडचणीचे झाले आहे.आज सकाळपासूनच विज गायब झाल्याने व्यापारी वर्गामधे संतापाची लाट उसळली. दुपारपर्यंत विज न आल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाउ पारीक यांच्या नेतृत्वाखालीविज वितरणच्या विभागीय कार्यालयावर धाव घेतली. विज वितरणच्या कारभारा विरोधात घोषणाबाजी करत कार्यालयासमोर व्यापाऱ्यांनी ठिया मारून धरणे आंदोल केले.संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबद अधिकाऱ्यांना जाब विचारला.वीज वितरणचे विभागीय अभियंता शैलेशकुमार यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करून येत्या आठवडाभरात कार्यवाही करण्याचे अश्वासन दिले. विज खंडीत होण्याचा वाढता प्रकार हा मनमाड शहर हे ‘जी’ झोन मधे गेले असल्याने होत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगीतले. या वर वाढती थकबाकी व वीजचोरी याला जबाबदार कोण असा जाब संतप्त व्यापाऱ्यांनी विचारला.विज वितरणचे अधिकारी व कर्मचारी शहरात वास्तव्यास रहात नसल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मुळे नियमीतपणे विज बिल भरणाऱ्या व्यापारी वर्गाला वेठीस धरले जात असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणने आहे.या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाउ पारीक, उपाध्यक्ष सुरेश लोढा,दादा बंब, सचिव राजकमल पांडे, रइस फारूकी, अनिल गुंदेचा, राजू चंद्रात्रे, कुलदीपसिंग चोटमुरादी,दिपक मुनोत मनोज जंगम, मनोज आचलीया, असीफ शेख, अशोक व्यवहारे, आबा दिंडोरकर, रवी लोढा आदी व्यापारी उपस्थित होते.(वार्ताहर)